Join us

IPL 2020 Final MI vs DC: मुंबई इंडियन्स-दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील विजेत्याचा होणार १० कोटींचा तोटा; जाणून घ्या कसा!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना आज दुबईत होणार आहे. चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)समोर दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) आव्हान आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: November 10, 2020 16:52 IST

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना आज दुबईत होणार आहे. चार वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)समोर दिल्ली कॅपिटल्सचे ( Delhi Capitals) आव्हान आहे. DCनं पहिल्यांदाच आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. MIनं यापूर्वी पाचपैकी चार वेळा ( २०१० वगळता) आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे मुंबईची ही घोडदौड दिल्ली रोखेल का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पण, यंदाच्या आयपीएल विजेत्या संघाला १० कोटींचा तोटा सहन करावा लागणार आहे. 

यंदाच्या आयपीएल विजेत्या संघाला २०१९च्या आयपीएल विजेत्या संघाला मिळालेल्या बक्षीस रक्कमेतील ५०टक्केच रक्कम मिळणार आहे. २०१९मध्ये मुंबई इंडियन्सनं ( MI) जेतेपद पटकावलं होतं आणि त्यांना २० कोटी बक्षीस रक्कम मिळाली होती, परंतु यंदाच्या विजेत्याला फक्त १० कोटी दिले जाणार आहेत. आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंगची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यंदा विजेत्या संघाला १० कोटी बक्षीस म्हणून मिळतील, असे बीसीसीआयनं सांगितले होते.

यंदाच्या विजेत्या संघाला १० कोटी दिले जाणार आहेत. शिवाय उपविजेत्याला १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटीच मिळणार आहेत. आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यंदा विजेत्या संघाला १० कोटी बक्षीस म्हणून मिळतील. २०१९च्या विजेत्या संघाला २० कोटी देण्यात आले होते, असे बीसीसीआयनं सांगितले होते. उपविजेत्या संघाला १२.५ कोटी ऐवजी ६.२५ कोटी देण्यात येणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयनं पीटीआयला दिली होती. क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी 4.375 कोटी रुपये मिळणार आहेत.

टॅग्स :IPL 2020मुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्स