दुबई : अपयशानंतरही आपल्या खेळाडूंवर विश्वास कायम ठेवला. अष्टपैलू शेन वॉटसनची कामगिरी हा याच यशाचा परिणाम असल्याचे मत चेन्नई सुपरकिंग्सचे कोच स्टीफन फ्लेंमिंग यांनी व्यक्त केले.
सलामीवीर वॉटसनने पंजाबविरुद्ध नाबाद ८३ धावांची खेळी करताच पराभवाच्या हॅट्ट्रिकनंतर रविवारी चेन्नईने पंजाबचा दहा गडी राखून पराभव केला होता.
फ्लेमिंग म्हणाले, ‘खेळाडूंना पाठिंबा देत असल्याने पुन्हा संधी मिळेल याची त्यांना खात्री असते. आम्ही त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोच शिवाय त्यांना भक्कम पाठिंबा देतो.’
वॉटसनचा खराब फॉर्म दूर करण्यासाठी काय केले, असे विचारताच प्रशिक्षक फ्लेमिंग म्हणाले, ‘नेटसवर सरावाद्वारे उणिवा दूर करून मुसंडी मारणे ही अनुभवी खेळाडूंची ओळख आहे. वॉटसनला केवळ एका चांगल्या खेळीची गरज होती. त्याचा फॉर्म आमच्यासाठी फार महत्त्वाचा असल्याने यानंतर विजयी वाटचाल कायम असेल, अशी खात्री वाटते.’वॉटसन आमच्यासाठी मॅचविनर आहे, हे विसरता येणार नाही, असेही ते म्हणाले.