मुंबई - Indian Premier League (IPL 2020) च्या १३ व्या पर्वात अनेक युवा खेळाडू आपली छाप पाडताना दिसत आहेत. यामध्ये आता भर पडली आहे ती राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागीची (Kartik Tyagi). त्यागीने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल पदार्पण करताना ३६ धावांमध्ये क्विंटन डीकॉकचा बहुमूल्य बळी मिळवला होता. त्यागीने आपल्या बॉलिंग अॅक्शनने सर्वांनाच प्रभावित केले. कॉमेंटेटर्सही त्यागीच्या गोलंदाजीबाबत बरीच चर्चा करताना दिसले. यावर राजस्थानचा हुकमी अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) यानेही ट्वीटरवर प्रतिक्रिया दिली. त्यावर एका चाहत्याने स्टोक्सलाच प्रश्न विचारताना त्याला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला.
आपल्या वेगवान मा-याने सा-यांनाच प्रभावित केलेल्या त्यागीने एका सामन्यातून सर्वांचे लक्ष वेधले. त्याची बॉलिंग अॅक्शन सर्वच क्रिकेट तज्ज्ञांच्या चर्चेचा विषय ठरली. यावर स्टोक्सने ट्वीट केले की, ‘त्यागीचा रन-अप ब्रेट लीसारखा आहे आणि तो चेंडू ईशांत शर्माप्रमाणे टाकतो.’ स्टोक्सचे हे मत खुद्द आॅस्टेÑलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज ब्रेट ली यानेही मान्य केले. सामन्यादरम्यानही अनेकदा त्यागीची बॉलिंग अॅक्शन दााखविण्यात आली.
स्टोक्सने व्यक्त केलेल्या मतावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र एका चाहत्याने केलेला प्रश्न लक्षवेधी ठरला. नोंब्रे नावाच्या युझरने स्टोक्सला प्रश्न केला की, ‘तू कौतुक करतोयस की, टोमणा मारतोय?’ यावर स्टोक्सनेही त्या चाहत्याला उत्तर दिले की, ‘मी कौतुक करत नाहीए आणि टोमणाही मारत नाहीए. हे माझे निरिक्षण आहे.’