Join us

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आहे ‘हल्क’चा फॅन

दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस हा अ‍ॅव्हेंजर सिरीजचा सुपर हिरो हल्कचा मोठा फॅन असल्याचे आता समोर आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 16:05 IST

Open in App

दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनिस हा अ‍ॅव्हेंजर सिरीजचा सुपर हिरो हल्कचा मोठा फॅन असल्याचे आता समोर आले आहे. दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे.  अबुधाबीत झालेल्या क्वालिफायर सामन्यात श्रेयस अय्यर आणि त्याच्या संघाने सनरायजर्सला १७ धावांनी पराभूत केले.

या सामन्यात स्टॉयनिसने २७ चेंडूत शानदार ३८ धावा दिल्या. त्याने शिखर सोबत दिलेल्या सलामीमुळे दिल्लीने धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर त्याने तीन षटकांत २६ धावा देत तीन गडी बाद केले. त्यानंतर त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यातआला. त्यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडू असलेल्या स्टॉयनिस याच्या हातात मार्व्हलच्या कॉमिक्समधील हल्क या सुपरहिरोची छोटी मुर्ती हातात दिसली. हल्क याचे कॅरेक्टर या सिरीजमध्ये स्टॅन ली आणि जॅक किर्बी यांनी तयार केले आहे. स्टॉयनिस याच्या मते जेव्हा तो गडी बाद करतो तेव्हा त्याच्या यशाचा आनंद साजरा करताना तो हल्कसारखाच दिसतो.

टॅग्स :IPL 2020दिल्ली कॅपिटल्स