Join us

IPL 2020 : दिल्ली, बँगलोर अव्वल दोनमध्ये स्थान मिळविण्यास प्रयत्नशील

IPL 2020 : दिल्ली व आरबी संघांदरम्यानच्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अलीकडच्या कालावधीत उभय संघांना सातत्याने पराभव स्वीकारावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 07:04 IST

Open in App

अबूधाबी : दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघांदरम्यान इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी लढत होणार आहे. उभय संघ पराभवाचे दुष्टचक्र भेदत अव्वल दोनमध्ये स्थान निश्चित करण्यास प्रयत्नशील आहेत. दिल्ली व आरबी संघांदरम्यानच्या लढतीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अलीकडच्या कालावधीत उभय संघांना सातत्याने पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्लीने सलग चार तर आरसीबीने सलग तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे आयपीएलमध्ये चित्र पालटायला वेळ लागत नसल्याची कल्पना येते. आत हे दोन्ही संघ पराभवाची मालिका खंडित करीत अव्वल दोनमध्ये स्थान निश्चित करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे त्यांना अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन संधी मिळतील. या लढतीतील पराभूत संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरू शकतो, पण त्यासाठी त्याला अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली संघ दमदार भासला, पण त्यानंतर त्यांचा आलेख घसरला. त्यांनी आपला अखेरचा विजय दोन आठवड्यांपूर्वी नोंदवला होता. त्यांचे फलंदाज अपयशी ठरत असून गोलंदाजही भेदक भासत नाहीत. 

मजबूत बाजूदिल्ली : धवन, श्रेयस अय्यर व ऋषभ पंत यांच्या समावेशामुळे फलंदाजी मजबूत. रबाडा भेदक मारा करण्यास सक्षम.बँगलोर : कोहली, डिव्हिलियर्स यांच्या समावेशामुळे फलंदाजी मजबूत. फिरकीपटू चहल व वाॅशिंग्टन सुंदर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सक्षम. 

कमजोर बाजूदिल्ली : नियमित सलामी जोडीचा अभाव. पृथ्वी शॉ व अजिंक्य राहणे यांनी धवनसोबत सलामीला जोडी बनविली, पण त्यांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. धवन गेल्या तीन सामन्यात अपयशी. मधली फळीही विशेष यशस्वी ठरली नाही. बँगलोर : कोहली व डिव्हिलियर्स गेल्या दोन लढतींमध्ये अपयशी. 

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरदिल्ली कॅपिटल्स