Join us  

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची उडवली दैना; मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहनं नोंदवला मोठा विक्रम

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला.

By स्वदेश घाणेकर | Published: November 06, 2020 5:30 PM

Open in App

मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा पहिला मान पटकावला. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ५ बाद २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) फलंदाजांना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि ट्रेंट बोल्ट ( Trent Boult) यांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. DCला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या. या सामन्यात MIच्या जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) ४ षटकांत १ निर्धाव षटकासह १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. बुमराहनं या कामगिरीसह IPLमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात बुमराहनं IPL मधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरीचीही नोंद केली. हा एकच विक्रम बुमराहनं नोंदवला नाही, तर त्यानं भुवनेश्वर कुमारचा ( २०१७) तीन वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. आयपीएलच्या एका पर्वात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा विक्रम बुमराहनं नावावर केला. यापूर्वी हा विक्रम भुवीच्या ( २६ विकेट्स) नावावर होता. बुमराहनं यंदाच्या पर्वात २७ विकेट्स घेत हा विक्रम मोडला आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडी घेतली. बुमराहनं शिखर धवन (०), श्रेयस अय्यर ( १२), मार्कस स्टॉयनिस ( ६५) आणि डॅनिएल सॅम्स ( ०) यांना बाद केले. 

या कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार देण्यात आला. तो म्हणाला,''विकेट मिळाली नाही तरी मला चालेल, परंतु स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे आहे. सोपलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न आहे. सुरुवातीलाच यॉर्करचा मारा करणे महत्त्वाचे आहे. कर्णधार जेव्हा जेव्हा मला गोलंदाजीसाठी बोलावतो, तेव्हा मी सज्ज असतो.'' 

टॅग्स :IPL 2020जसप्रित बुमराहमुंबई इंडियन्सदिल्ली कॅपिटल्सभुवनेश्वर कुमार