Join us  

IPL 2020 : सीएसकेच्या ‘या’ स्टार अष्टपैलूने राजस्थानकडून खेळावे; शेन वॉर्नची इच्छा

राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याने चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एका स्टार अष्टपैलूने राजस्थानकडून खेळावे, अशी इच्छा व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 1:42 PM

Open in App

मुंबई  -ऑस्टेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर आणि राजस्थान रॉयल्सचा (Rajsthan Royals) माजी कर्णधार शेन वॉर्न (Shane Warn) याने चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Superkings) संघातील स्टार अष्टपैलूने राजस्थानकडून खेळावे, अशी इच्छा व्यक्त केली. आज राजस्थान रॉयल्स किंग्ज ईलेव्हन पंजाबच्या आव्हानाला सामोरे जाईल आणि या सामन्यात या स्टार खेळाडूसारख्या खेळाडूची संघाला आवश्यकता असल्याचे मत वॉर्नने व्यक्त केले. वॉर्नच्याच नेतृत्त्वाखाली राजस्थानने २००८ साली आयपीएलचे पहिले जेतेपद उंचावले होते.शेन वॉर्नने चेन्नईचा स्टार अष्टपैलू रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) राजस्थानकडून खेळावे अशी इच्छा व्यक्त केली. त्याचप्रमाणे, त्याने पंजाबच्या ग्लेन मॅक्सवेललाही पसंती दिली. याआधी 2008 साली आयपीएलच्या पहिल्या सत्रात जडेजा राजस्थान संघाकडून खेळला होता. आपल्या अत्यंत वेगवान फेकीमुळे जडेजाने सर्वांनाच प्रभावित केले आहे. चेन्नईसाठी सध्या जडेजा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू असून गोलंदाजीतही तो निर्णायक ठरतो.राजस्थानच्या इन्स्टाग्राईम लाईव्ह चॅट शोदरम्यान वॉर्न म्हणाला की, ‘माझामते जडेजा सध्याचा जगातील सर्वोत्तम फिल्डर आहे. त्याच्याप्रमाणेच माझी पसंती ग्लेन मॅक्सवेलला असून या दोघांनी आमच्याकडून खेळण्यासाठी मला टॉस करावा लागेल. जडेजाने अनेकदा स्टम्पचा अचूक वेध घेतला आहे. २००८ साली त्याच्यासोबत खेळणे नेहमीच आनंददायी ठरले. माझी ईच्छा आहे की, त्याने राजस्थानकडून खेळावे.’राजस्थानने आता किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध कंबर कसली असून राजस्थानसाठी हा सामना आव्हानात्मक ठरेल, असेही वॉर्नने सांगितले. ‘पंजाबविरुद्धचा सामना राजस्थानसाठी धोकादायक ठरु शकतो, तो लोकेश राहुलच्या फॉर्ममुळे. राहुलने आपल्या याआधीच्या जबरदस्त फलंदाजी केली.’ 

टॅग्स :IPL 2020राजस्थान