दुबई : कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सपुढे इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्सचे कडवे आव्हान राहणार आहे. या लढतीत उभय संघांच्या फलंदाजांच्या कामगिरीवर नजर राहील.
गेल्या लढतीत संथ फलंदाजीमुळे टीकाकारांचे लक्ष्य ठरलेल्या केदार जाधवला वगळले तर ऋतुराज गायकवाड किंवा एन. जगदीशन यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. दुसऱ्या बाजूचा विचार करता कर्णधार विराट कोहलीला सूर गवसल्यामुळे फलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे. युवा देवदत्त पडिक्कल व अनुभवी एबी डिव्हिलियर्स यांनी चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजांनी यापूर्वी केकेआरविरुद्ध चमक दाखवली आहे. पीयूष चावलाच्या स्थानी आलेल्या कर्ण शर्माने किफायती मारा करताना बळीही घेतले.
वेदर रिपोर्ट । दिवसाचे तापमान ३६ डिग्री सेल्सिअस असण्याची शक्यता. ह्युमिडिटी ४५ टक्के तर हवेचा वेग २४ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.
पीच रिपोर्ट । प्रथम फलंदाजी स्वीकारणे लाभदायक. दुसºया डावात खेळपट्टीचे स्वरूप बदलते. पहिल्या डावात सहज धावा होत असताना दुसºया डावात मात्र अडचण भासते.
मजबूत बाजू
चेन्नई । शेन वॉटसनला सूर गवसला आहे. फाफ ड्यूप्लेसिसने कामगिरीत सातत्य राखले आहे. गोलंदाजीमध्ये ड्वेन ब्राव्हो चांगली कामगिरी करीत आहे.
बँगलोर । कोहलीसारखा कर्णधार व फलंदाज. युवा देवदत्त पडिक्कल व अनुभवी एबी डिव्हिलियर्स यांची उल्लेखनीय कामगिरी.
कमजोर बाजू
चेन्नई । मधली फळी गरजेपेक्षा अधिक बचावात्मक. कर्णधार धोनी स्वत: फॉर्मात नाही.
बँगलोर। गोलंदाजीमध्ये लेग स्पिनर युजवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक. मोहम्मद सिराज व नवदीप सैनी महागडे ठरले.