दुबई : निराशाजनक सुरुवातीमुळे चिंतित चेन्नई सुपर किंग्स रविवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत आपल्या उणिवा दूर करण्यास प्रयत्नशील असेल. चेन्नई सुपरकिंग्स चार सामन्यांत तीन पराभवासह आता गुणतालिकेत तळाच्या स्थानी आहे.
संघात पुनरागमन करण्याची क्षमता आहे, पण क्षेत्ररक्षण, गोलंदाजी व फलंदाजी या सर्व विभागात सुधारणा होणे आवश्यक आहे. धोनीने सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दडपणाखाली फलंदाजी केली. अपेक्षा उंचावलेल्या असल्यामुळे धोनी व त्याच्या संघाचे अपयश वाईट दिसत आहे.
वेदर रिपोर्ट- दिवसाचे तापमान ३७ डिग्री राहण्याची शक्यता. ह्युमिडिटी ५३ टक्के आणि वाऱ्याचा वेग २३ किलोमीटर प्रतितास असण्याची शक्यता.
पीच रिपोर्ट- खेळपट्टीचे स्वरूप बदलत जाते. लक्ष्याचा पाठलाग करणे कठीण होते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा.
मजबूत बाजू
चेन्नई । गेल्या लढतीत कर्णधार धोनी व रवींद्र जडेजा यांना सूर गवसल्याचे दिसले. वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी, दीपक चाहर यांची कामगिरी उल्लेखनीय.
पंजाब। कर्णधार लोकेश राहुल व मयंक अग्रवाल शानदार फॉर्मात. दोघेही आक्रकम सुरुवात करण्यात माहीर.
कमजोर बाजू
चेन्नई । धोनी आक्रमक खेळी करण्यात अपयशी. मधल्या षटकांमध्ये धावगती संथ. त्यामुळे मोठे लक्ष्य गाठण्यात अपयश.
पंजाब । मर्यादित गोलंदाजीमुळे पराभव. मोहम्मद शमीचा अपवाद वगळता अन्य गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यात अपयशी.