Join us

IPL 2020, CSK vs DC Match: चेन्नईपुढे दिल्लीचे कडवे आव्हान; शानदार कामगिरी करावी लागणार

प्रीव्ह्यू । आजचा सामना, चेन्नईकडे धोनीचे कुशल नेतृत्व असून रायुडू, फाफ ड्यूप्लेसिस, शेन वॉटसन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 07:29 IST

Open in App

शारजाह : चेन्नई सुपरकिंग्सची गाडी पुन्हा रुळावर आली आहे, पण पुढील सामन्यात शनिवारी त्यांना दिल्ली कॅपिटल्सच्या कडव्या आव्हानाला सामोेरे जावे लागणार आहे. चेन्नईला यंदाच्या सत्रातील आशा कायम राखण्यासाठी दिल्लीविरुद्ध शानदार कामगिरी करावी लागेल. चेन्नईची लढत आत्मविश्वास उंचावलेल्या दिल्ली संघाविरुद्ध आहे.

चेन्नईकडे धोनीचे कुशल नेतृत्व असून रायुडू, फाफ ड्यूप्लेसिस, शेन वॉटसन चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दिल्लीतर्फे द.आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा व ऑनरिख नॉर्खियासह फिरकीपटू आर. अश्विन व अक्षर पटेल प्रभावी कामगिरी करीत आहेत. पृथ्वी शॉ व शिखर धवन यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे.

टॅग्स :चेन्नई सुपर किंग्सडीसीIPL 2020