Join us  

IPL 2020: बापरे! केवळ चौकार-षटकारांच्या सहाय्यानेच पूर्ण केल्या १० हजार धावा; युनिव्हर्स बॉसचा दणका!

IPL 2020 chris gayle: आयपीएल २०२०च्या निम्म्या हंगामात संधी न मिळालेल्या ख्रिस गेलची मैदानात उतरताच जोरदार फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 3:56 PM

Open in App

मुंबई : क्रिकेटमध्ये अनेक विक्रम रचले जातात आणि मोडलेही जातात. यातील काही विक्रमांकडे पाहून आश्चर्याचा धक्काही बसतो. असाच एक धक्कादायक विक्रम रचला आहे तो वेस्ट इंडिजचा अत्यंत स्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) याने. टी-२० क्रिकेटमध्ये गेलला ‘बॉस’ म्हणून ओळखले जाते आणि त्याने रचलेल्या या अनोख्या विक्रमाकडे पाहून नक्कीच कळेल, की त्याला बॉस का म्हटले जाते.४१ वर्षीय गेल जगभरातील अनेक टी-२० लीगमध्ये आपला दबदबा राखून आहे. सध्या यूएईमध्ये सुरु असलेल्या Indian Premier League (IPL 2020) मध्ये तो किंग्ज ईलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. गुरुवारीच झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्ध खेळताना त्याने आक्रमक अर्धशतक झळकावताना एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हा विक्रम पाहूनच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण गेलने टी-२० क्रिकेटमध्ये केवळ चौकार-षटकारांच्या जोरावरच १० हजार धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे, हे विशेष!गेलने टी-२० क्रिकेटमध्ये कधीच १० हजार धावा पूर्ण केल्या. सध्या टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३,३४९ धावांची नोंद आहे. पण आता त्याने केवळ चौकार-षटकारांच्या सहाय्याने १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.केवळ चौकार व षटकारांच्या सहाय्याने १० हजार धावा पूर्ण करणे अत्यंत कठीण आहे. मात्र गेलने सहजपणे हा पल्ला पार केला आहे.टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विश्वविक्रमही गेलच्याच नावावर असून त्याने आयपीलमध्येच नाबाद १७५ धावांची वादळी खेळी केली होती. शिवाय त्यान टी-२० क्रिकेटमध्ये २२ शतकांसह ८३ अर्धशतके झळकावली आहेत. गेलव्यतिरिक्त टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा शोएब अख्तर आणि वेस्ट इंडिजच्याच किएरॉन पोलार्ड यांनी दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 

टॅग्स :IPL 2020ख्रिस गेलकिंग्स इलेव्हन पंजाब