IPL 2020: आयपीएलला केंद्राची मंजुरी- ब्रिजेश पटेल

यूएईत आयोजनासाठी बीसीसीआयला मिळाली लेखी प्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 07:41 IST2020-08-10T23:40:32+5:302020-08-11T07:41:44+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2020 Centre gives formal approval to hold tournament in UAE | IPL 2020: आयपीएलला केंद्राची मंजुरी- ब्रिजेश पटेल

IPL 2020: आयपीएलला केंद्राची मंजुरी- ब्रिजेश पटेल

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वाचे आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्ये करण्यास केंद्र शासनाने सोमवारी औपचारिक मंजुरी प्रदान केली. लीगचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली.

आयपीएलचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत शारजा, अबुधाबी आणि दुबईत होणार आहे. सरकारने मागच्या आठवड्यात बीसीसीआयला तत्त्वत: मंजुरी दिली होती, मात्र लेखी प्रत मिळू शकली नव्हती. भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्याने यंदा यूएईत आयोजन होत आहे. भारतातील कुठल्याही क्रीडा संस्थेला स्थानिक स्पर्धा विदेशात करायची झाल्यास गृह, विदेश आणि क्रीडा मंत्रालयाची परवानगी घेणे अनिवार्य असते.

बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ‘सरकारकडून मंजुरी मिळाल्याने आम्ही आता एमिरेटस् बोर्डाला कळविले आहे. लेखी मंजुरीची माहिती आता सर्व आठही संघांना देत आहोत.’ अनेक संघ २२ ऑगस्ट रोजी यूएईकडे रवाना होणार आहेत. परवानगीआधी त्यांना २४ तासात दोनदा आरटी पीसीआर चाचणी करावी लागेल. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर खेळाडू यूएईकडे रवाना होऊ शकतील.
चेन्नई सुपरकिंग्स संघ चेपॉक म्ौदानावर छेटेखानी शिबिराचे आयोजन करणार असून २२ आॅगस्टला दुबईकडे प्रस्थान करणार आहे. (वृत्तसंस्था)

‘विवो’चे बाहेर पडणे बीसीसीआयसाठी धक्का नाही. पतंजलीने मुख्य प्रायोजकासाठी इच्छा व्यक्त केली आहे. अनेक कंपन्यांनी आधीही आमच्याशी संपर्क केला आहे. जी कंपनी सर्वाधिक बोली लावेल त्यांना अधिकार मिळतील, मग ती भारतीय कंपनी असो वा विदेशी. १८ आॅगस्टपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.’
-ब्रिजेश पटेल, चेअरमन आयपीएल.

Web Title: IPL 2020 Centre gives formal approval to hold tournament in UAE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :IPLआयपीएल