Join us  

IPL 2020: पंजाब ठरणार 'किंग'; जाणून घ्या लिलावासाठी कोणाचा किती बजेट! 

IPL Auction 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२० च्या मोसमासाठीचे ट्रेड विंडो ( अदलाबदली ) आज बंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 7:18 PM

Open in App

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२० च्या मोसमासाठीचे ट्रेड विंडो ( अदलाबदली ) आज बंद झाली. सर्व संघानी आपापल्या संघांतून काही खेळाडूंना रिलीज केले आणि या करारमुक्त झालेल्या खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकाता येथे होणार आहे. प्रत्येक संघांनी यशस्वी रणनीती आखून संघातील नावाजलेल्या आणि महागड्या खेळाडूंना डच्चू देत सर्वांना आश्चर्यचकित केले. या खेळाडूंना मुक्त करून संघाने लिलावासाठीचा आपला बजेट वाढवला. त्यात यंदा प्रत्येक संघाला आपल्याकडील ३ कोटी बजेट मध्ये जमा करण्याची मुभा दिल्यानं लिलावात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. 

किंग्स इलेव्हन पंजाबने डेव्हिड मिलर, ॲंड्र्यू टे, सॅम कुरन, वरून चक्रवर्ती या खेळाडूंना रिलीज केले आहे.

 

ट्रेड विंडो बंद झाल्यानंतर कोणाकडे किती रुपये राहिले ते पाहूया.. 

चेन्नई सुपर किंग - १४.६ कोटीदिल्ली कॅपिटल्स - २७. ८५ कोटीकिंग्ज इलेव्हन पंजाब - ४२.७ कोटीकोलकाता नाइट रायडर्स - ३५.६५ कोटीराजस्थान रॉयल्स - २८.९ कोटीमुंबई इंडियन्स- १३.०५ कोटी सनरायझर्स हैदराबाद - १७ कोटीरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - २७.९ कोटी

टॅग्स :आयपीएल 2020आयपीएल लिलाव 2020किंग्ज इलेव्हन पंजाब