IPL 2020 : दिल्लीच्या शानदार कामगिरीने ब्रायन लारा प्रभावित, युवा फलंदाजीचे कौतुक

लाराने सांगितले की, मला वाटते की, दिल्ली  कॅपिटल्सचा पृथ्वी शॉ हा त्यांच्यासाठी भविष्यातील सर्वात शानदार खेळाडू आहे. तो वेगाने त्याच्या खेळात सुधारणा देखील करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 13:35 IST2020-10-10T13:35:08+5:302020-10-10T13:35:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2020 : Brian Lara impressed with Delhi's brilliant performance, admired young batting | IPL 2020 : दिल्लीच्या शानदार कामगिरीने ब्रायन लारा प्रभावित, युवा फलंदाजीचे कौतुक

IPL 2020 : दिल्लीच्या शानदार कामगिरीने ब्रायन लारा प्रभावित, युवा फलंदाजीचे कौतुक

ठळक मुद्देलाराने सांगितले की, मला वाटते की, दिल्ली  कॅपिटल्सचा पृथ्वी शॉ हा त्यांच्यासाठी भविष्यातील सर्वात शानदार खेळाडू आहे. तो वेगाने त्याच्या खेळात सुधारणा देखील करत आहे.

जळगाव : दिल्ली कॅपिटल्सचे युवा फलंदाज यांचे भविष्य उज्ज्वल आहे. त्यांच्या शानदार कामगिरीने मी प्रभावीत झालो आहे, अशा शब्दात वेस्ट
इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत यांचे कौतुक केले. लारा एका क्रीडा कार्यक्रमात बोलताना म्हणाला की, आयपीएल हा एक शानदार प्लॅटफॉर्म आहे. त्यातून नेहमीच नव्या खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करता येते. 

लाराने सांगितले की, मला वाटते की, दिल्ली  कॅपिटल्सचा पृथ्वी शॉ हा त्यांच्यासाठी भविष्यातील सर्वात शानदार खेळाडू आहे. तो वेगाने त्याच्या
खेळात सुधारणा देखील करत आहे. मी त्याच्या फलंदाजीबद्दल बोलत आहे. त्याने लेगसाईडला फटके खेळण्याबाबत चांगलीच सुधारणा केली आहे. त्याच्या धावांकडे बघा. तो उत्तम कामगिरी करत आहे. पंत हा २०१८ च्या सत्रात एक उत्तम खेळाडू होता. त्याने त्या सत्रात ६८४ धावा केल्या होत्या. त्यात एक शतक आणि पाच अर्धशतके होती. त्यामुळे त्याने भारतीय संघात स्थान देखील मिळवले. त्यानंतर पंत हा जेवढा यशस्वी ठरला त्यापेक्षा जास्त वेळा तो अपयशी राहिला आहे. पंत हा नुकताच २२ वर्षांचा झाला. त्याने या सत्रात ३१,३७,२८,३८,३७ अशी धावसंख्या प्रत्येक सामन्यात उभारली आहे. तसेच त्याच्याकडे संपूर्ण मैदानात कुठेही फटका मारण्याची क्षमता आहे. लारा म्हणाला की, सध्या तो संतुलित वाटतो. त्याच्या शानदार फलंदाजीने त्याने प्रभावीत केले आहे. मला विश्वास आहे की, तो नक्कीच पुढे जाईल.
 

Web Title: IPL 2020 : Brian Lara impressed with Delhi's brilliant performance, admired young batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.