Join us

IPL 2020 : तू बेन स्टेक्स देखील म्हणू शकतो, आर्चरने सांगितला त्याचा आवडता हिंदी शब्द!

राजस्थान रॉयल्सचा संघ सहकारी जोफ्रा आर्चरसोबत चर्चा करतांना म्हटले की माझ्या नावालाच एक हिंदी शब्द बनवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 18:54 IST

Open in App

राजस्थान रॉयल्सचा संघ सहकारी जोफ्रा आर्चरसोबत चर्चा करतांना म्हटले की माझ्या नावालाच एक हिंदी शब्द बनवला आहे. बेन स्टोक्स याने आर्चरला विचारले की तुझा आवडता हिंदी शब्द कोणता आहे. मला नाही वाटत तू सांगू शकशील.’ त्यावर आर्चरने उत्तर दिले की लवकर, लवकर, तू बेन स्टोक्स देखील म्हणू शकतो. यावर स्टोक्स याने उत्तर दिले की, ‘माझ्या नावाला एक हिंदी शब्द बनवले आहे.’

बेन स्टोक्स याने याआधी देखील यावरून ट्विट केले होते. आर्चर आणि स्टोक्स हे दोघेही राजस्थान रॉयल्ससाठी खेळतात. दोघेही यंदाच्या सत्रात शानदार फॉर्ममध्ये आहेत. नुकतेच दोन्ही खेळाडू एका रॅपीड फायर राऊंडमध्ये सहभागी झाले होते. त्यात दोघांनी एकमेकांना त्यांच्या कारकिर्दीबद्दल अनेक प्रश्न विचारले. त्यात स्टोक्सने आर्चरला त्याचा आवडता हिंदी शब्द विचारला होता. मात्र हा शब्द आर्चर सांगु शकणार नाही, असेही त्याला म्हटले होते.

आर्चर म्हणाला की, जल्दी हा शब्द त्याला आवडतो’ तो लगेचच पुढे म्हणाला की, तू बेन स्टोक्स देखील म्हणू शकतो.’ त्यावर स्टोक्स याने सांगितले की माझ्या नावानेच एक हिंदी शब्द तयार झाला आहे.  

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :IPL 2020बेन स्टोक्सजोफ्रा आर्चर