दुबई : भारत सरकारची लेखी परवानगी मिळाल्यानंतर यूएईत होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वाच्या तयारीचा संपूर्ण आढावा घेण्याच्या कामाला वेग आला आहे. कोरोनामुळे अनेक अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार असल्यामुळे बीसीसीआयचे एक पथक २२ ऑगस्ट रोजी यूएईकडे रवाना होणार आहे. आयपीएलला १९ सप्टेंबर रोजी सुरुवात होईल. १० नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल.
‘गल्फ टाइम्स’च्या वृत्तानुसार, बीसीसीआय पथकात आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल, बीसीसीआय सचिव जयेश शाह, कोषाध्यक्ष अरुण धुमल, अंतरिम सीईओ हेमांग अमीन आदींचा समावेश असेल. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली या पथकात असतील का, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बीसीसीआय पथकात काही निवडक फ्रेन्चाईजी प्रमुख आणि प्रसारणकर्ते स्टार स्पोर्ट्सचे प्रतिनिधीदेखील सहभागी होऊ शकतात. सध्यातरी यूएईसाठी कुठलीही नियमित फ्लाईट नाही. त्यामुळे या पथकाच्या दौºयासाठी चार्टर्ड विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. सर्व अधिकाऱ्यांना स्टेडियम तसेच अन्य सुविधांचा आढावा घेण्याआधी हॉटेलच्या खोलीत सहा दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल.
जाणकारांच्या मते, बीसीसीआयची ही यूएई भेट महत्त्वपूर्ण असेल. त्यात आयपीएलसाठी लागणाºया सर्व सोयी जसे हॉटेल, प्रवास व्यवस्था आणि अन्य सर्वच विषयांवर अंतिम निर्णय घेण्यात येतील. (वृत्तसंस्था)
तयारीसंदर्भात अमिरात क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाºयांसोबत संवाद, यूएईतील महत्त्वाच्या मंत्र्यांसोबत चर्चा, भारतीय दूतावासासोबत चर्चा
आयपीएल २०२० च्या तयारीवर देखेरख ठेवण्यासाठी दुबईत बीसीसीआयचे कार्यालय उघडण्यावर चर्चा, वेळापत्रकाला अंतिम रूप देणे
दुबई, अबूधाबी आणि शारजा क्रिकेट मैदानांचे निरीक्षण आरोग्यासंदर्भात सर्व सोयींचा आढावा घेणार, आयपीएलनिमित्त तयार होत असलेल्या बायो-बबलचा अनुभव घेणे