IPL 2020 : आर्चरच्या बिहू डान्सनंतर त्याचे मूळ स्थान गुगलवर ट्रेण्ड

IPL 2020 : आता भारतीय आणि विशेषत: आसामसह पुर्वोत्तर भारतात जोफ्रा आर्चरचे मुळ देश कोणता, हे सर्च करण्याच ट्रेण्ड गुगलवर सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 20:44 IST2020-10-15T20:31:42+5:302020-10-15T20:44:30+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2020: Archer's Bihu Dance after its original location trends on Google | IPL 2020 : आर्चरच्या बिहू डान्सनंतर त्याचे मूळ स्थान गुगलवर ट्रेण्ड

IPL 2020 : आर्चरच्या बिहू डान्सनंतर त्याचे मूळ स्थान गुगलवर ट्रेण्ड

राजस्थान रॉयल्सच्या जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर याने दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ याला बाद केल्यावर आसामचा पारंपारिक बिहु हा नृत्य प्रकार करत आपला आनंद व्यक्त केला होता.त्यामुळे आता भारतीय आणि विशेषत: आसामसह पुर्वोत्तर भारतात जोफ्रा आर्चरचे मुळ देश कोणता, हे सर्च करण्याच ट्रेण्ड गुगलवर सुरू आहे.

जोफ्रा आर्चर हा मुळचा बार्बाडोसचा आहे. पण तो इंग्लंडकडून खेळतो. आर्चरच्या आधी त्याचा राजस्थान रॉयल्सचा संघ सहकारी रियान पराग याने
देखील सनरायजर्स विरोधातील विजयानंतर आपला आनंद साजरा करताना बिहु डान्स केला होता. आता आर्चरनेही हाच प्रकार केल्याने गुगल सर्चमध्ये त्याचे मुळ पैतृक स्थान आघाडीवर आहे.

आर्चर याने आतापर्यंत २९ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३८ बळी घेतले असून १५ धावात तीन बळी अशी त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

 

Web Title: IPL 2020: Archer's Bihu Dance after its original location trends on Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.