Join us  

IPL 2020 : आम्हालाही तो आदर मिळायला हवा, असं नाही का वाटत? गावस्करांच्या कमेंटवर अनुष्का भडकली

RCB vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League 2020) गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन ...

By स्वदेश घाणेकर | Published: September 25, 2020 3:25 PM

Open in App

RCB vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( Indian Premier League 2020) गुरुवारी झालेल्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) च्या तडाख्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघाचा पालापाचोळा झाला. KXIPचा कर्णधार लोकेश राहुलनं ( KL Rahul) वादळी शतकी खेळी करताना RCBच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. या सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) एक धाव करून माघारी परतला आणि त्यावरून माजी क्रिकेटपटू व समालोचक सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी केलेल्या कमेंटनं सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून अनुष्का शर्मानं ( Anushka Sharma) पोस्ट लिहून माजी कसोटीपटू गावस्कर यांच्यावर टीका केली. IPL 2020 Updates

KL Rahulने 69 चेंडूंत 14 चौकार व 7 षटकार खेचून नाबाद 132 धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर KXIPने 3 बाद 206 धावांचा डोंगर उभा केला. या लक्ष्याचा पाठलाग करताना RCB चा संपूर्ण संघ 17 षटकांत 109 धावांत माघारी परतला. विराट कोहली तिसऱ्याच षटकात माघारी परतला. तत्पूर्वी तो फलंदाजीला आला, तेव्हा गावस्कर यांनी कमेंट केली.  त्यांनी या विधानात कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) हीचा उल्लेख होता आणि त्यामुळे आता गावस्कर यांना समालोचकांच्या पॅनलवरून हटवण्याची मागणी होत आहे. IPL 2020 Updates

लॉकडाऊन मे बस....; विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्यावरील सुनील गावस्कर यांच्या कमेंटवरून वाद

अनुष्का शर्माची भली मोठी पोस्ट अन् टीका...सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांच्या विधानावर अनुष्का शर्मानं भली मोठी पोस्ट लिहिली. विराट कोहलीच्या कामगिरीवरून स्वतःचं नाव खेचल्यानं अनुष्का नाराज झाली. तिनं लिहिलं की,''तुम्ही केलेली कमेंट त्रासदायक आहे, परंतु पतीच्या कामगिरीवर पत्नीला जबाबदार धरण्याचं विधान का केलंत, याचं उत्तर मला द्यायला आवडेल. गेली अनेक वर्ष एखाद्या क्रिकेटपटूच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुम्ही त्याच्या खाजगी आयुष्याचा आदर केला असेलच, याची मला खात्री आहे. मग, तुम्हाला असं वाटत नाही का आम्हालाही तसाच समान आदर मिळायला हवा? माझ्या पतीच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना तुमच्या डोक्यात शब्दांचा भंडार नक्कीच होता किंवा तुमचं ते विधान माझ्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नव्हतं का?''IPL 2020 Updates

''2020वर्ष आलं, परंतु माझ्यासाठी काहीच बदललेलं नाही. माझं नाव क्रिकेटमध्ये ओढणं कधी थांबेल आणि अशा कमेंट कधी थांबतील? गावस्कर तुम्ही या जंटलमन्स खेळाचे दिग्गज खेळाडू आहात. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की, तुमच्या विधानानं दुःख झाले,''असेही अनुष्का म्हणाली.  

टॅग्स :IPL 2020अनुष्का शर्माविराट कोहलीसुनील गावसकरकिंग्स इलेव्हन पंजाबरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर