IPL 2020 : विराटसमोर जी हुजर केलं नाही म्हणून रायडू भारतीय संघाबाहेर, जडेजाचा आरोप

मुंबईविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात अंबाती रायडूने मुंबईविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे आज होणाऱ्या लढतीत रायडूच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल.

By बाळकृष्ण परब | Published: September 22, 2020 04:19 PM2020-09-22T16:19:07+5:302020-09-22T16:20:26+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2020: Ambati Rayudu out of Indian team for not appearing before Virat, Jadeja accused | IPL 2020 : विराटसमोर जी हुजर केलं नाही म्हणून रायडू भारतीय संघाबाहेर, जडेजाचा आरोप

IPL 2020 : विराटसमोर जी हुजर केलं नाही म्हणून रायडू भारतीय संघाबाहेर, जडेजाचा आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने रायडूबाबत मोठे विधान केले आहेकप्तानामागून जी हुजूर करत न फिरल्याने अंबाती रायडूला भारतीय संघातून बाहेर जावे लागलेरायडूची एकदिवसीय क्रिकेटमधील सरासरी ५० च्या आसपास आहे

नवी दिल्ली - आयपीएलमध्ये आज होणाऱ्या चौथ्या लढतीत चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्सचे संघ आमने-सामने येणार आहेत. यापूर्वी मुंबईविरुद्ध झालेल्या सलामीच्या सामन्यात अंबाती रायडूने मुंबईविरुद्ध धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे आज होणाऱ्या लढतीत रायडूच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. दरम्यान, मुंबईविरुद्ध निर्णायक खेळी केल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने रायडूबाबत मोठे विधान केले आहे. कप्तानामागून जी हुजूर करत न फिरल्याने अंबाती रायडूला भारतीय संघातून बाहेर जावे लागले असा आरोप अजय जडेजाने केला आहे.

क्रिकबझच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अजय जडेजा म्हणाला की, अंबाती रायडूला पहिल्यांदा चौथ्या क्रमांकावरून हटवण्यात आले. त्यानंतर या क्रमांकासाठी नव्या फलंदाजाचा शोध सुरू झाला. रायडूची एकदिवसीय क्रिकेटमधील सरासरी ५० च्या आसपास आहे. मोठमोठ्या खेळाडूंचीसुद्धा एवढी सरासरी नाही. मात्र जेव्हा संघाचा कर्णधार बदलतो तेव्हा जी हुजुर करत नाहीत असे खेळाडू संघाबाहेर होतात. मला वाटतं रायडू त्याच खेळाडूंपैकी एक आहे.

अंबाती रायडूला २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर भारतीय संघाने या स्थानावर विजय शंकर आणि ऋषभ पंत यांना संधी दिली. मात्र हा प्रयोग फसला आणि विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत भारताला याचा फटका बसला.

अजय जडेजा पुढे म्हणाला की, रायडू अशा खेळाडूंपैकी आहे. जो मनाला लागणाऱ्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवतो. मुंबई इंडियन्सने अंबाती रायडूला सोडले. तेव्हापासून तो मुंबईविरुद्ध सातत्याने धावा बनवत आहे. रायडूने चेन्नईला नेहमीच जिंकवले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय कारकिर्द लहान असली तरी तो मोठा खेळाडू आहे. त्याच्या कारकीर्दीत दोन-तीन घटना घडल्या नसत्या तर तो अजूनही भारतीय संघासाठी खेळला असता.

Web Title: IPL 2020: Ambati Rayudu out of Indian team for not appearing before Virat, Jadeja accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.