मुंबई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 12 व्या मोसमातील सातवा सामना गुरुवारी खेळला गेला. मुंबई इंडियन्सने बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 6 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातनंतर पर्पल आणि ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील चुरस अधिक वाढली आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर बंगळुरूच्या युजवेंद्र चहलने पर्पल कॅपच्या शर्यतीत एन्ट्री घेतली आहे, तर नीतीश राणा ऑरेंज कॅपच्या पंक्तीत आघाडीवर आहे.
ऑरेंज कॅपचे दावेदार
नीतीश राणा ( कोलकाता नाइट रायडर्स) 131 धावा 161.72 सरासरी
रिषभ पंत ( दिल्ली कॅपिटल्स) 103 धावा 257.50 सरासरी
रॉबिन उथप्पा ( कोलकाता नाइट रायडर्स) 102 धावा 132.46 सरासरी
ख्रिस गेल ( किंग्स इलेव्हन पंजाब) 99 धावा 165.00 सरासरी
आंद्रे रसेल ( कोलकाता नाइट रायडर्स ) 97 धावा 269.44 सरासरी
पर्पल कॅपचे दावेदार
युजवेंद्र चहल ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) 5 विकेट 5.50 सरासरी
इम्रान ताहिर ( चेन्नई सुपर किंग्स) 4 विकेट 4.83 सरासरी
जसप्रीत बुमराह ( मुंबई इंडियन्स) 4 विकेट 7.50 सरासरी
ड्वेन ब्राव्हो ( चेन्नई सुपर किंग्स) 4 विकेट 7.92 सरासरी
आंद्रे रसेल ( कोलकाता नाइट रायडर्स) 4 विकेट 8.83 सरासरी