Join us

IPL 2019 : वृद्धिमान साहाला पहिल्याच चेंडूवर दिले आऊट, तरी तो नाबाद ठरला, पाहा व्हिडीओ

पंचांनी साहाला आऊट दिले, पण साहा त्यानंतरही खेळत होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 20:22 IST

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : दिल्ली-हैदराबाद यांच्यातील एलिमिनेटर सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर एक नाट्य पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादकडून ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकत होता, तर दिल्ली कॅपिटल्सचावृद्धिमान साहा बॅटींग करत होता. यावेळी पंचांनी साहाला आऊट दिले, पण साहा त्यानंतरही खेळत होता.

बोल्टने पहिलाच चेंडू अचूक टाकला. हा चेंडू साहाच्या पॅडला लागल्याचे दिसत होते. दिल्लीच्या संघाने जोरदार अपील केली आणि पंचांनीही साहाला बाद असल्याचे सांगितले. त्यानंतर नाट्याला सुरुवात झाली. साहाने सलामीवीर मार्टिन गप्तीलशी चर्चा केली आणि त्यानंतर डीआएस घेतला. डीआरएसमध्ये बोल्टचा चेंडू साहाच्या बॅटला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी साहाला नाबाद ठरवले. त्यामुळे मैदानावरील पंचांनी पहिल्याच चेंडूवर बाद दिलेला साहा हा नाबाद ठरला.

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज एलिमिनेटरचा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामान जो संघ जिंकेल, त्याला क्वालिफायर-2 मध्ये खेळण्याची संधी मिळेल. पण जो संघ पराभूत होईल त्याचे आव्हान संपुष्टात येईल.

टॅग्स :वृद्धिमान साहासनरायझर्स हैदराबादआयपीएल 2019दिल्ली कॅपिटल्स