Join us

IPL 2019 : जेव्हा आयपीएल कॉमेंट्री खुर्चीवर उभे राहून करायची वेळ येते, व्हिडीओ वायरल

या व्हिडीओमध्ये आयपीएलची कॉमेंट्री खुर्चीवर उभी राहुन केले गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 18:08 IST

Open in App

आयपीएल 2019 : आयपीएलमध्ये अशी गोष्ट घडेल, असा विचारही तुम्ही कधी केला नसेल. कारण आयपीएलमध्ये यापूर्वी असा प्रकार पाहायला मिळाला नसेल. आयपीएलचा एक व्हिडीओ चांगलाच वायर झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयपीएलची कॉमेंट्री खुर्चीवर उभी राहुन केले गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

हा सामना झाला तो चेन्नईमध्ये. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये हा सामना खेळवला जात असताना हा प्रकार पाहायला मिळाला. या सामन्याची कॉमेंट्री भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन करत होते. त्यावेळी कॉमेंट्रीरुमच्या काचेवर भरपूर दव पडले होते. त्यामुळे कॉमेंट्री करताना सामन्यात नेमके काय चाललंय ते दिसत नव्हते. त्यावेळी शिवरामकृष्णन यांनी थेट खुर्चीवर उभे राहून कॉमेंट्री करत असल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स