Join us

IPL 2019 : जेव्हा गेल आणि चहल यांची धक्काबुक्की होते तेव्हा...

... त्यावेळी गेल आणि चहलमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 20:55 IST

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : किंग्ज इलेव्हन पंजाबचा ख्रिस गेल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा युजवेंद्र चहल यांना डोळ्यासमोर आणून बघा. या दोघांमध्ये जर धक्काबुक्की झाली तर काय होईल, हे आता तुमच्या डोळ्यापुढे आलेच असेल. पण असे घडल्याचे मोहालीच्या स्टेडियममध्ये पाहायला मिळाले आहे.

 

पंजाबच्या सलामीवीरांनी पहिल्या सहा षटकांमध्ये बळी न मिळवता 60 धावांची सलामी दिली. त्यानंतर सातव्या षटकामध्ये विराट कोहलीने चहलच्या हाती चेंडूं सुपूर्द केली. चहल सातवे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळी चहल गोलंदाजीचा सराव करत होता. त्यावेळी लोकेश राहुल हा स्ट्राइकवर होता, तर गेल हा नाइट स्ट्राइकवर होता. त्यावेळी चहलने खेळपट्टीकडे पाहिले आणि हाताला माती लावली. त्यावेळी गेल आणि चहलमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. पण ती धक्काबुक्की नव्हती. कारण गेलने गमतीने चहलला ढकलल्याचे त्यानंतर निष्पन्न झाले.

 

टॅग्स :ख्रिस गेलयुजवेंद्र चहलआयपीएल 2019