Join us  

IPL 2019 : चेन्नईला 'Top Two'मध्ये राहण्यासाठी करावी लागेल ही गोष्ट

IPL 2019: गतविजेता चेन्नई सुपर किंग्स संघ इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 18 गुणांसह अव्वल स्थानावर आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 3:54 PM

Open in App

मोहाली, आयपीएल 2019 : गतविजेता चेन्नई सुपर किंग्स संघ इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 18 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांचा प्ले ऑफमधील प्रवेश हा निश्चितच आहे. पण, अव्वल दोन संघांत स्थान कायम राखून अंतिम फेरीत प्रवेश करण्याची एक अतिरिक्त संधी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे मोहालीत आज किंग्स इलेव्हन पंजाब येथे होणाऱ्या सामन्यात त्यांना 'Top Two'मध्ये राहण्यासाठी गणिताचे पालन करावे लागणार आहे. त्यात अपयशी ठरल्यास आणि मुंबई इंडियन्सने अखेरच्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवल्यास चेन्नई 'Top Two'मधून बाहेर जाऊ शकतात.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने 13 सामन्यांत 9 विजयासह 18 गुणांची कमाई केली आहे. आयपीएलच्या 12व्या मोसमात प्ले ऑफचे तिकीट पक्के करणारा तो पहिलाच संघ ठरला आहे. 18 गुणांसह दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे, परंतु दिल्लीचे 14 सामने झाले आहेत. मुंबई इंडियन्स 13 सामन्यांनंतर 16 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. नेट रन रेटच्या बाबतीत चेन्नई ( 0.209 ) ची बाजू भक्कम आहे. मात्र, मुंबईने ( 0. 321) कोलकाताला मोठ्या फरकाने नमवल्यास ते अव्वल स्थानावर जाऊ शकतील. अशा परिस्थितीत चेन्नईसाठी आजचा सामना तितकाच महत्त्वाचा आहे.

चेन्नईने हा सामना जिंकल्यास तेच अव्वल स्थानावर कायम राहतील, परंतु हरल्यास त्यांना अव्वल दोन स्थानातून बाहेर जावे लागेल. त्यांना 40 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने ते पराभूत झाल्यास नेट रन रेटवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण, प्रथम फलंदाजी करत असल्याने चेन्नईसमोरील ही अडचणही दूर झाली आहे. दुसरीकडे पंजाबला प्ले ऑफच्या आशा जीवंत राखण्यासाठी या सामन्यात 251+ धावांच्या फरकाने किंवा चेन्नईला 100च्या आत गुंडाळावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना कोलकाताच्या पराभवाची प्रतीक्षा पाहावी लागेल. पण, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन त्यांनी प्ले ऑफचा मार्ग स्वतः बंद केला आहे. 

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सकिंग्ज इलेव्हन पंजाब