Join us

IPL 2019: चेन्नईची नजर ‘प्ले ऑफ’ गाठण्यावर

चेन्नई सुपरकिंग्स रविवारी रॉयल चॅलेंसर्ज बँगलोरवर विजय मिळवून ‘प्ले ऑफ’कडे कूच करण्याच्या इराद्यासह उतरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 03:28 IST

Open in App

बेंगळुरु : चेन्नई सुपरकिंग्स रविवारी रॉयल चॅलेंसर्ज बँगलोरवर विजय मिळवून ‘प्ले ऑफ’कडे कूच करण्याच्या इराद्यासह उतरणार आहे. गतविजेत्या चेन्नईला मागच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादकडून पराभवाचा धक्का बसला. यंदाच्या सत्रात हा त्यांचा दुसरा पराभव होता. आरसीबीवर विजय मिळाल्यास चेन्नईचे १६ गुणांसह ‘प्ले आॅफ’मधील स्थान निश्चित होईल.हैदराबादविरुद्ध दुखापतीमुळे धोनी खेळू शकला नव्हता. रविवारी मात्र तो नक्की खेळणार, असे संकेत मिळाले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीपासून उभय संघाची वाटचाल वेगळ्या दिशेने झाली. चेन्नईने पाठोपाठ विजय मिळविले तर आरसीबी संघ पराभवाच्या खाईत लोटत गेला. शुक्रवारी केकेआरवर विजय मिळविल्याने आरसीबीचा आत्मविश्वास वाढला असेल.आंद्रे रसेल व नितीश राणा यांच्या चमकदार कामगिरीनंतरही आरसीबीने वर्चस्व गाजविले. त्यांचा नऊ सामन्यात हा दुसरा विजय होता. २०१६ मध्ये देखील आरसीबीने सुरुवातीला सात सामने गमविल्यानंतर अखेरच्या सातपैकी सहा सामन्यात विजय नोंदवून प्ले आॅफमध्ये धडक दिली होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर