Join us

IPL 2019 : मोहित शर्मानं घेतली 'कॅप्टन कूल' धोनीच्या पत्नीची शाळा, Video

IPL 2019: नवी दिल्ली-चेन्नई परतीच्या प्रवासात घडला हा मजेशीर प्रसंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 19:27 IST

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये विजयाचा धडाका कायम राखणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ शुक्रवारी घरच्या दिशेने रवाना झाला. रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांना पराभूत केल्यानंतर गतविजेता चेन्नई घरच्या मैदानावर रविवारी राजस्थान रॉयल्सचा सामना करणार आहे. पण, या प्रवासाचा थकवा जाणवू नये म्हणून खेळाडू अनेक आयडियांनी स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सलामीच्या सामन्यानंतर मोहित शर्माने केदार जाधवची मुलाखत घेतली आणि त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जाधवची चांगलीच फिरकी घेतली. 

चेन्नई ते नवी दिल्ली या प्रवासातील हा मजेशीर प्रसंग ताजा असताना परतीच्या प्रवासातही गोलंदाज मोहित शर्माने सहकाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. पण, यावेळी मोहितने कॅप्टन कूल धोनीची पत्नी साक्षीलाही समाविष्ट केले. मोहितने विचारलेल्या प्रश्नांवर साक्षी धोनीला उत्तर देता न आल्याने एकच हशा पिकला. 

पाहा व्हिडीओ..   'घरी जायचं आहे का', कॅप्टन कूल धोनीचा केदार जाधवला सवालमोहित आणि केदार जाधव यांच्यातील संभाषणात कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं उडी घेतली आणि जाधवची फिरकी घेतली. जाधवने बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात नाबाद 13 धावा केल्या. जाधवने यावेळी 2018च्या आयपीएल हंगामातील पहिल्या सामन्याच्या आठवणीला उजाळा दिला. त्याही हंगामातील पहिल्या सामन्याच्या विजयी क्षणाच्यावेळी जाधव खेळपट्टीवर होता आणि यंदाच्या पहिल्या विजयातही तो खेळपट्टीवर होता. 

जाधव म्हणाला,''मागील हंगाम आणि आताच्या हंगामातील पहिल्या सामन्यात बरेच साम्य आहे. आम्ही गतवर्षी पहिला सामना जिंकलो होतो आणि त्यावेळी मी खेळपट्टीवर उपस्थित होतो आणि यंदाही तसेच घडले.''  या वक्तव्यावर धोनीनं त्याची चांगलीच फिरकी घेतली. 2018च्या पहिल्या सामन्यात जाधवला दुखापत झाली होती आणि त्याला संपूर्ण सत्र मुकावे लागले होते. त्यावरून धोनी त्याला म्हणाला,'' परत घरी जायचा प्लॅन करत आहेस का?''

धोनीच्या या वाक्यावर जाधवनेही तोडीसतोड उत्तर दिले. पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीआयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्स