Join us

IPL 2019 : अन् सुरेश रैनानं भर मैदानात रवींद्र जडेजाचा घेतला मुका, Video

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपला दबदबा कायम राखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 12:10 IST

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आपला दबदबा कायम राखताना रविवारी राजस्थान रॉयल्सला नमवले. चेन्नईने 8 धावांनी राजस्थानवर मात करून आयपीएलच्या 12व्या हंगामात सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. चेन्नईच्या 175 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला 8 बाद 167 धावा करता आल्या. 

राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकाराले आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. त्यामुळे चेन्नईचे तीन फलंदाज फक्त 27 धावांत बाद झाले. पण त्यानंतर मात्र धोनी आणि सुरेश रैना यांनी संघाला सावरले. रैनाने 32 चेंडूंत 36 धावा केल्या. या दोघांनी 61 धावांची भागीदारी केली. रैना बाद झाल्यानंतर धोनीनं फटकेबाजी केली. त्याने सामना केलेल्या अखेरच्या 12 चेंडूंत तब्बल 42 धावा चोपल्या. त्यात चार षटकार व दोन चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईने 175 धावांपर्यंत मजल मारली. 

या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला पहिल्याच षटकात धक्का बसला. दीपक चहरने राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. रवींद्र जडेजाने अप्रतिम झेल टिपत रहाणेला तंबूत जाण्यास भाग पाडले. पण, त्यानंतर जे घडले ते कोणालाही अपेक्षित नव्हते. सुरेश रैनाने भर मैदानात जडेजाचा मुका घेतला. 

पाहा व्हिडीओ... 

टॅग्स :आयपीएल 2019सुरेश रैनारवींद्र जडेजाचेन्नई सुपर किंग्सराजस्थान रॉयल्स