Join us

IPL 2019 : स्टीव्हन स्मिथ पुन्हा चुकला, भलतंच बोलून बसला

IPL 2019 : स्टीव्हन स्मिथ एका वर्षाच्या बंदीनंतर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 20:06 IST

Open in App

हैदराबाद, आयपीएल 2019 : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथ एका वर्षाच्या बंदीनंतर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार फटकेबाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा हा खेळाडू आजच्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मोठी खेळी करण्यास आतुर आहे. त्याच्या पुनरागमनामुळे राजस्थानची बॅटींग ऑर्डर मजबूत झाली आहे. त्याने आयपीएलप्रती असलेले प्रेमही बोलून दाखवले, परंतु त्यानं यावेळी एक चुक केली. तो म्हणाला,''मला बिग बॅश लीगमध्ये ( त्वरीत चुक सुधारत) आयपीएलमध्ये खेळायला नेहमी आवडते.''  

2017 मध्ये स्मिथने रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर चेंडू कुरतडण्या प्रकरणी त्याच्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने एका वर्षांची बंदी घातली. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षे आयपीएलपासून दूर राहिलेल्या राजस्थान रॉयल्सने स्मिथला पुन्हा आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. 

 पाहा व्हिडीओ...  

टॅग्स :स्टीव्हन स्मिथराजस्थान रॉयल्सआयपीएल 2019सनरायझर्स हैदराबाद