IPL 2019 : चेन्नईचे 132 धावांवर समाधान

चेन्नईच्या शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ७९ धावांची सलामी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 09:43 PM2019-04-17T21:43:43+5:302019-04-17T21:47:53+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: A solution to Chennai's 132 runs | IPL 2019 : चेन्नईचे 132 धावांवर समाधान

IPL 2019 : चेन्नईचे 132 धावांवर समाधान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, आयपीएल २०१९ : दमदार सलामी मिळाल्यानंतरही चेन्नई सुपर किंग्सला फक्त 132 धावांवरच समाधान मानावे लागले. 



 

चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी चेन्नईच्या शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस यांनी ७९ धावांची सलामी दिली. वॉटसनने यावेळी २९ चेंडूंत ३१ धावा केल्या. शेनपेक्षा फॅफ चांगल्या फॉर्मात होता. फॅफने ३१ चेंडूंत ४५ धावांची खेळी साकारली. या ४५ धावांच्या खेळीत फॅफने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले.



 

शेन आणि फॅफ जेव्हा बाद झाले तेव्हा अकराव्या षटकात चेन्नईची २ बाद ८१ अशी स्थिती होती. पण त्यानंतर कर्णधार सुरेश रैना, केदार जाधव, सॅम बिलिंग्स हे झटपट बाद झाले आणि चेन्नईचा डाव अडचणीत आला. त्यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी संघाला सावरले.

Web Title: IPL 2019: A solution to Chennai's 132 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.