जयपूर, आयपीएल 2019 :महिलांच्या आयपीएलच्या पहिल्याच ट्रेलब्रेझर आणि सुपरनोव्हास यांच्यातील पहिल्या सामन्यात स्मृती मंधानाची धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली. ट्रेलब्रेझरची कर्णधार असलेल्या स्मृतीच्या दमदार खेळीच्या जोरावर ट्रेलब्रेझरला सुपरनोव्हासपुढे 141 धावांचे आव्हान ठेवता आले.
सुपरनोव्हास संघाने नाणेफेक जिंकत ट्रेलब्रेझरला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ट्रेलब्रेझरला सुझी बेट्सच्या रुपात पहिलाच धक्का लवकर बसला. पण त्यानंतर स्मृती आणि हार्लिन देओल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी रचली आणि संघाला सन्मानजक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.
![]()
स्मृतीने यावेळी 67 चेंडूंत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 90 धावांची धडाकोबाज खेळी साकारली. देओलने यावेळी तीन चौकारांच्या जोरावर 36 धावा करत स्मृतीला चांगली साथ दिली. सुपरनोव्हास संघाकडून राधा यादवने दोन विकेट्स मिळवल्या.