Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019: सलग सहा पराभवामुळे मार्ग सोपा झाला - कोहली

आता मी आणि माझे सहकारी विनादिक्कत प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहोत, अशी प्रतिक्रिया रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 06:56 IST

Open in App

बेंगळुरु : सलग सहा सामने गमविल्यामुळे आमचा संघ खडबडून जागा झाला. आता मी आणि माझे सहकारी विनादिक्कत प्रत्येक सामन्याचा आनंद घेत आहोत, अशी प्रतिक्रिया रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली. आरसीबीने बुधवारी पंजाबचा १७ धावांनी पराभव केला. सामन्यानंतर विराट म्हणाला, ‘आमचे लक्ष बहारदार खेळ करण्यावर आहे. सलग सहा सामने गमविल्यामुळे विजयाची जिद्द निर्माण झाली. आमच्याशिवाय कुठल्याही संघाने अशा विपरीत परिस्थितीचा सामना केलेला नाही. आता सामन्याचा आनंद घेत मोकळेपणाने खेळत आहोत.’ आरसीबीला प्ले ऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

टॅग्स :आयपीएल 2019विराट कोहलीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर