Join us

IPL 2019 : समालोचकांच्या कंपनीतील सात खेळाडू आयपीएलमध्ये, बीसीसीआयच्या कारवाईवर नजर

यापूर्वी बीसीसीआयने सुनील गावस्कर यांना दणका दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 17:15 IST

Open in App

कोलकाता, आयपीएल 2019 : परस्पर हितसंबंध जपल्यामुळे बऱ्याच माजी आणि आजी खेळाडूंवर बीसीसीआयने कारवाई केली आहे. पण सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये परस्पर हितसंबंध जपत अससल्याची बाब समोर आली आहे. आयपीएलमधील काही समालोचकांनी एक स्पोर्ट्स मॅनेजमेंट ग्रुप बनवला आहे आणि त्यामध्ये आयपीएलमधील सात खेळाडू खेळत आहेत. त्यामुळे आता या समालोचकांवर बीसीसीआय काय कारवाई करते, याकडे साऱ्यांे लक्ष लागून राहिले आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा, ग्रॅमी स्मिथ, अॅलन विल्किंन्स, एम. बांगवा आणि मेल जोन्स यांनी कॉर्नरस्टोन नावाची एक कंपनी बनवली आहे. या कंपनीमध्ये आयपीएलमधील विराट कोहली, लोकेश राहुल, कुलदीप यादव, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, उमेश यादव आणि इशान किशन हे खेळाडू आहेत. या खेळाडूंच्या कामगिरीवर हे समाचोलक टिप्पणी करत असतात. त्यामुळे हे परस्पर हितसंबंध जपण्यासारखे आहे. त्यामुळे आता बीसीसीआय काय कारवाई करते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

यापूर्वी बीसीसीआयने सुनील गावस्कर यांना दणका दिला होता. कारण गावस्कर यांच्या प्रोफेशनल ग्रुप मॅनेजमेंटमधील काही खेळाडू खेळत होते. त्यावेळी गावस्कर यांनी एक तर कंपनी चालवा किंवा समालोचन करा, हे दोन पर्याय ठेवण्यात आले होते. त्यावेळी गावस्कर यांनी समालोचन करण्याचा पर्याय निवडला होता.

टॅग्स :विराट कोहलीरिषभ पंत