चेन्नई, आयपीएल 2019: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या सामन्यात कोणत्या फलंदाजाचे वादळ घोंगावणार, अशी चर्चा सुरु होती. पण सामना सुरु होण्यापूर्वी स्टेडियममध्ये वाळूचे वादळ आले होते. त्यामुळे खेळाडूंना सराव करता आला नाही. या वादळामुळे खेळाडूंचे मैदानावरील क्रीडा साहित्यही एका जागेवर राहत नव्हते. खेळपट्टी झाकण्याचा यावेळी पीच क्युरेटरकडून प्रयत्न करण्यात आला, पण त्यामध्येही त्यांना यश मिळत नव्हते. नेमकं काय चाललंय, हे साऱ्यांसाठीच अनाकलनीय असेच होते.
हा पाहा वादळाचा व्हिडीओ
![]()
आतापर्यंत राजस्थानच्या संघाने चार सामने खेळले आहेत. पण या चार सामन्यांमध्ये राजस्थानला फक्त एकाच सामन्यामध्ये विजय मिळवता आला आहे. त्यामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. राजस्थानने गेल्या सामन्यात बंगळुरुवर विजय मिळवला होता. हा यंदाच्या हंगामातील त्यांचा पहिला विजय होता. त्यामुळे आता दुसरा विजय मिळवण्यासाठी राजस्थानचा संघ सज्ज असेल.
... असा मिळवला होता राजस्थानने बंगळुरुवर विजय
राजस्थान रॉयल्सने आपल्या चौथ्या सामन्यात अखेर पहिल विजय मिळवला. भेदक गोलंदाजी आणि जोस बटलरच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने बंगळुरुवर विजय मिळवला. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या. या आव्हानाचा सहजपणे यशस्वी पाठलाग राजस्थानने केला. राजस्थानने हा सामना सात विकेट्स राखून जिंकला.
बटलर आणि अजिंक्य रहाणे यांनी संघाला चांगील सुरुवात करून दिली. राजस्थानच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळे राजस्थानला पाच षटकांमध्ये एकही फलंदाज न गमावता ४६ धावा करता आल्या. अजिंक्यच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. अजिंक्यने २० चेंडूंत २२ धावा केल्या. त्यानंतर बटलरने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर जोस बटलरच्या रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. बटलरने ४३ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५९ धावा केल्या.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची सुरुवात आश्वासक झाली नाही. बंगळुरुचा डाव आता कोसळणार असे वाटत असताना पार्थिव पटेलने संघाच्या डावाला आधार दिला. पटेलच्या अर्धशतकाच्या जोरावर बंगळुरुला राजस्थानपुढे १४९ आव्हान ठेवता आले.
राजस्थानने नाणेफेक जिंकून बंगळुरुला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बंगळुरुला यावेळी ४९ धावांची सलामी मिळाली आणि त्यांना पहिला धक्का बसला तो विराट कोहलीच्या रुपात. श्रेयस गोपाळने अप्रतिम चेंडू टाकत कोहलीचा मिडल स्टम्प उडवला. कोहलीला २५ डूंत २३ धावा करता आल्या. कोहलीनंतर बंगळुरुने काही फरकाने दोन फलंदाज गमावले. पण या साऱ्या घडामोडी घडत असताना पटेल मात्र संघाची धावगती वाढवण्यासाठी प्रयत्नशील होता. पटेलने यावेळ २९ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पटेलने ४१ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ६७ धावा केल्या.