जयपूर, आयपीएल २०१९ :भेदक गोलंदाजी आणि दमदार सलामीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवला. मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या दमदार खेळींच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादला १६० धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान राजस्थानने सात विकेट्स राखत पूर्ण केले.
11:32 PM
राजस्थानचा सात विकेट्स राखून विजय
11:19 PM
स्टीव्हन स्मिथ आऊट
स्टीव्हन स्मिथच्या रुपात राजस्थानला तिसरा धक्का बसला. स्मिथने १६ चेंडूंत २२ धावा केल्या.
10:48 PM
राजस्थानला दुसरा धक्का
अजिंक्य रहाणेच्य़ा रुपात राजस्थानला दुसरा धक्का बसला. अजिंक्यने ३९ धावांची खेळी साकारली.
10:36 PM
लायम विलिंगस्टोन आऊट
लायम विलिंगस्टोनच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. लायम विलिंगस्टोनने २५ चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ४४ धावा केल्या.
10:21 PM
राजस्थानच्या ६ षटकांत ६० धावा
09:40 PM
भुवनेश्वर कुमार आऊट
भुवनेश्वरच्या रुपात हैदराबादला आठवा धक्का बसला. भुवनेश्वरला एक धाव काढता आली.
09:31 PM
शकिब अल हसन आऊट
शकिब अल हसनला जयदेव उनाडकटने श्रेयस गोपाळकरवी झेलबाद केले. शकिबला यावेळी ९ धावा करता आल्या.
09:22 PM
दीपक हुडा शून्यावर आऊट
08:57 PM
हैदराबादला दुसरा धक्का
डेव्हिड वॉर्नरच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. वॉर्नरने ३२ चेंडूंत ३७ धावांची खेळी साकारली.
08:54 PM
मनीष पांडेचे अर्धशतक
मनीषने दमदार फलंदाजी करत २७ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले.
08:53 PM
हैदराबादची शतक
बाराव्या षटकामध्ये मनीष पांडेने दोन धावा घेत हैदराबादचे शतक फलकावर लावले.
08:46 PM
हैदराबाद १० षटकांत १ बाद ८६
हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या १० षटकांमध्ये दमदार फलंदाजी केली. पहिल्या १० षटकांमध्ये हैदराबादने केन विल्यमसनला गमावले, पण त्यांनी ८६ धावांची भर घातली.
08:19 PM
हैदराबादला पहिला धक्का
केन विल्यमसनच्या रुपात हैदराबादला पहिला धक्का बसला. केनला १४ चेंडूंत १३ धावा करता आल्या.
07:38 PM
हैदराबादची प्रथम फलंदाजी
राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.
07:35 PM
राजस्थान आणि हैदराबाद संघांचा कसून सराव, पाहा व्हिडीओ