Join us  

IPL 2019 RR vs MI: राजस्थानचा मुंबईवर 5 विकेट राखून विजय

जयपूर, आयपीएल 2019 : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. कर्णधारपदाची झालेली खांदेपालट राजस्थानला फळली. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 3:23 PM

Open in App

07:47 PM



 

07:26 PM

07:26 PM



 

07:19 PM

राजस्थानला विजयासाठी हव्यात 24 चेंडूंत 25 धावा



 

07:16 PM



 

07:14 PM

कर्णधार स्मिथ आणि रियान पराग यांनी राजस्थानची गाडी पुन्हा रुळावर आणली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला 15 षटकांत 128 धावांपर्यंत मजल मारून दिली. 

07:12 PM



 

06:46 PM

06:45 PM

चहरने त्याच षटकात बेन स्टोक्सचाही त्रिफळाही उडवला. स्टोक्स भोपळाही न फोडता माघारी परतला.



 

06:43 PM

चहरने मुंबईला आणखी एक विकेट मिळवून दिला. त्याच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात सॅमसनने चेंडू उंच उडवला आणि किरॉन पोलार्डने तो टिपला. सॅमसनने 19 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 35 धावा केल्या. 
 

06:36 PM


लक्ष्याचा पाठलाग करताना संजू सॅमसन आणि अजिंक्य रहाणे यांनी राजस्थानला आश्वासक सुरुवात करून दिली. चौथ्या षटकात राहुल चहरने मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्याने रहाणेला ( 12) सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. सॅमसन एका बाजूने संघर्ष करत होता. त्याच्या खेळीमुळे राजस्थानने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 60 धावा केल्या. 
 

05:56 PM



 

05:48 PM



 

05:47 PM

आर्चरने अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकला पायचीत केले. हार्दिकने 15 चेंडूंत 23 धावा केल्या. 
 

05:43 PM

19व्या षटकात पुन्हा आर्चरने पांड्याला जीवदान दिले. उनाडकटच्या गोलंदाजीवरच आर्चरने झेल सोडला आणि पांड्याने पुढच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. 

05:31 PM



 

05:30 PM

17व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जोफ्रा आर्चरने मुंबईच्या हार्दिक पांड्याचा सोपा झेल सोडला. हार्दिकने टोलावलेला चेंडू आर्चरच्या हातात सहज झेपावला होता, परंतु तो हातात राखण्यात आर्चरला अपयश आले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर किरॉन पोलार्डने षटकार खेचला. पण जयदेव उनाडकटने ही कसर भरून काढली, पुढच्याच चेंडूवर उनाडकटने पोलार्डचा त्रिफळा उडवला.

05:25 PM



 

05:15 PM

पुढच्या षटकात डी कॉकही माघारी परतला. श्रेयस गोपाळने सामन्यातील दुसरी विकेट घेतली. डी कॉकने 47 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून 65 धावा केल्या. 

05:13 PM

05:13 PM

14व्या षटकात डी कॉक व यादव ही जोडी तुटली. स्टुअर्ट बिन्नीने यादवला ( 34) कुलकर्णीकरवी झेलबाद केले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. 

05:05 PM



 

04:52 PM

डी कॉकने 34 चेंडूंत अर्धशतक झळकावले. मुंबईने 10 षटकांत 1 बाद 81 धावा केल्या. 



 

04:42 PM

डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. 

04:31 PM

मुंबईने पॉवर प्लेमध्ये 1 बाद 46 धावा केल्या. 


 

04:25 PM

रोहित शर्माची विकेट पाहा

https://www.iplt20.com/video/174456

04:19 PM

मात्र, पुढच्याच षटकात डी कॉकने सर्व दडपण झुगारून धवल कुलकर्णीच्या गोलंदाजाची धुलाई केली. डी कॉकने कुलकर्णीच्या त्या षटकात सलग तीन चौकार व एक षटकारासह 19 धावा चोपल्या. 



 

04:16 PM

त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर क्विंटन डी कॉकला जीवदान मिळाले. जोफ्रा आर्चरचा झेल घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. 

04:14 PM

मुंबईला तिसऱ्याच षटकात झटका बसला. राजस्थानच्या श्रेयस गोपाळने तिसऱ्याच षटकात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला ( 5) बाद केले.



 

04:02 PM

आयपीएलमध्ये स्टीव्हन स्मिथच्या कर्णधारपदाची विजयाची टक्केवारी ही 66.67 अशी आहे. त्याने 24 सामन्यांतील 16 सामने जिंकले आहेत. पूणे वॉरियर्स इंडिया ( 1), राजस्थान रॉयल्स ( 8) आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स ( 15) आदी संघांचे नेतृत्व सांभाळले आहे. 

03:54 PM

03:54 PM

03:50 PM



 

03:40 PM

मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, बेन कटिंग, सूर्यकुमार यादव, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड, राहुल चहर, मयांक मार्कंडे, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.
 

03:39 PM

राजस्थान रॉयल्सः अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, अॅश्टन टर्नर, बेन स्टोक्स, रियान पराग, जोफ्रा आर्चर, स्टुअर्ट बिनी, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकत, धवल कुलकर्णी
 

03:35 PM



 

03:35 PM

मुंबईच्या संघात एक बदल. जयंत यादवच्या जागी मयांक मार्कंडेला संधी. राजस्थानच्या संघात तीन बदल जॉस बटलर, इश सोधी व राहुल त्रिपाठी आजच्या सामन्याला मुकणार. स्मिथ, बेन स्टोक्स आणि रियान पराग यांचे कमबॅक. 
 

03:29 PM

आजच्या सामन्याला जोस बटलर मुकणार.... राजस्थान रॉयल्सकडून सलामीला कोण येणार? बटलरच्या पत्नीनं बाळाला जन्म दिला आणि त्यामुळे बटलर मायदेशात रवाना झाला. 

03:25 PM



 

टॅग्स :आयपीएल 2019राजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्स