IPL 2019 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात

जयपूर, आयपीएल 2019 : यंदाच्या हंगामातील राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा पहिला सामना आज रंगतो आहे. या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 07:39 PM2019-03-25T19:39:42+5:302019-03-25T23:46:15+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात | IPL 2019 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात

IPL 2019 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर, आयपीएल 2019 : यंदाच्या हंगामातील राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांचा पहिला सामना आज रंगतो आहे. या लढतीमध्ये सर्वांचेच लक्ष असेल तर स्टिव्हन स्मिथकडे. कारण बंदीमुळे स्मिथला गेल्यावर्षी आयपीएलमध्ये खेळता आले नव्हते. त्यामुळे या हंगामात पुनरागमन करताना स्मिथ कशी कामगिरी करतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

11:41 PM

पंजाबचा राजस्थानवर 14 धावांनी विजय

मोठे फटके मारण्याच्या नादात राजस्थानच्या फलंदाजांनी आपल्या विकेट्स पंजाबला आंदण दिल्या आणि 14 धावांनी पराभव ओढवून घेतला.

11:25 PM

राहुल त्रिपाठी बाद

बेन स्टोक्सला बाद केल्यावर मुजीब उर रेहमानने राहुल त्रिपाठीलाही तंबूत धाडले.

11:21 PM

बेन स्टोक्स आऊट

षटकार ठोकल्यावर त्यानंतरच्याच चेंडूवर बेन स्टोक्स आऊट झाला. मुजीब उर रेहमानने स्टोक्सला गुगली टाकत तंबूत धाडले.

11:19 PM

स्मिथपाठोपाठ संजू सॅमसनही बाद

स्मिथनंतर दोन चेंडूंमध्येच संजू सॅमसनही बाद झाला. सॅमसनने 30 धावा केल्या.

11:16 PM

स्टीव्हन स्मिथ आऊट

स्टीव्हन स्मिथच्या रुपात राजस्थानला तिसरा धक्का बसला. स्मिथने एक चौकार आणि षटकारांच्या मदतीने 20 धावा केल्या.

10:52 PM

राजस्थानला मोठा धक्का, जोस बटलर आऊट

राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर 69धावांवर बाद झाला. बटलरने 43 चेंडूंत दहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ही खेळी साकारली.

69 (43b 10x4 2x6

10:46 PM

राजस्थानचे शतक

बाराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर संजू सॅमसनने एकेरी धाव घेत राजस्थानचे शतक पूर्ण केले.

10:33 PM

अजिंक्य रहाणे बाद, राजस्थानला पहिला धक्का

अजिंक्य रहाणेच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. रहाणेने 20 चेंडूंत चार चौकारांच्या मदतीने 27 धावा केल्या.

10:32 PM

जोस बटलरचे अर्धशतक

राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने 29 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. बटलरने चौकार लगावत अर्धशतकाला गवसणी घातली.

10:18 PM

राजस्थानची दमदार सलामी

राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पाच षटकांमध्ये संघाला 45 धावा करून दिल्या.

09:49 PM

पंजाब 20 षटकांत 4 बाद 184



 

09:37 PM

निकोल पूरन आऊट

निकोलस पूरनच्या रुपात पंजाबला चौथा धक्का बसला. पूरनला दहा धावा करता आल्या.

09:16 PM

ख्रिस गेल आऊट, पंजाबला मोठा धक्का

धडाकेबाज फलंदाजी करणारा ख्रिस गेल अखेर 79 धावांवर बाद झाला. गेलने 47 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 79 धावांची वादळी खेळी साकारली.

08:59 PM

ख्रिस गेलचे अर्धशतक

ख्रिस गेलने षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. गेलने 33 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

08:41 PM

पंजाबला दुसरा धक्का

मयांक अगरवालच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का बसला. मयांकने 24 चेंडूंत 22 धावा केल्या.

08:27 PM

ख्रिस गेलच्या चार हजार धावा पूर्ण

पंजाबचा कर्णधार ख्रिस गेलने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात आयपीएलमधील चार हजार धावा पूर्ण केल्या. सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना अव्वल स्थानी आहे. 

08:09 PM

लोकेश राहुल आऊट

किंग्ज इलेव्हन पंजाबला लोकेश राहुलच्या रुपात पहिला धक्का बसला. राहुलला यावेळी फक्त चार धावाच करता आल्या.

07:44 PM

राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली

राजस्थान रॉयल्सने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेने हा निर्णय घेतल्यामुळे आता किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे.

Web Title: IPL 2019 Live : अटीतटीच्या लढतीत पंजाबची राजस्थानवर मात

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.