बंगळुरु, आयपीएल 2019 : शिमरॉन हेटमायर आणि गुरकिरत सिंग यांच्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर आरसीबीने सनरायझर्स हैदराबादला पराभूत केले. या विजयासह आरसीबीने या हंगामाचा शेवट गोड केला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डी'व्हिलियर्स यांना मोठी खेळी साकारता आली नसली तरी आरसीबीने विजय मिळवला, हे लक्षणीय ठरले. हैदराबादच्या 176 धावांचा पाठलाग करताना विराट कोहली आणि एबी हे झटपट बाद झाले. पण त्यानंतर मात्र हेटमायरने हैदराबादच्या गोलंदाजांना धारेवर धरले. हेटमायरने 47 चेंडूंत 75 धावांची दमदार खेळी साकारली. हेटमायर आणि गुरकिरत यांनी चौथ्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी रचली. हेटमायरनंतर गुरकिरतही बाद झाला, त्याने 48 चेंडूंत 65 धावा केल्या.
11:42 PM
हेटमायर आणि गुरकिरत ठरले विजयाचे शिल्पकार
11:40 PM
अखेरच्या सामन्यात आरसीबीचा विजय
11:27 PM
शिमरॉन हेटमायर आऊट
11:16 PM
गुरकिरतचे अर्धशतक
11:07 PM
हेटमायर आणि गुरुकिरत यांची शतकी भागीदारी
10:49 PM
शिमरोन हेटमायरचे 32 चेंडूंत अर्धशतक
10:11 PM
एबी डी'व्हिलियर्स आऊट
एबी डी'व्हिलियर्सच्या रुपात आरसीबीला मोठा धक्का बसला. एबी डी'व्हिलियर्सला फक्त एकच धाव काढता आली.
10:05 PM
विराट कोहली आऊट
विराट कोहलीच्या रुपात आरसीबीला मोठा धक्का बसला. कोहलीने 7 चेंडूंत 16 धावा केल्या.
10:01 PM
पार्थिव पटेल आऊट
पार्थिव पटेलच्या रुपात आरसीबीला पहिला धक्का बसला. पार्थिव पटेलला एकही धाव काढता आली नाही.
09:37 PM
विल्यम्सनचे अर्धशतक
निर्णायक सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सनने अर्धशतक झळकावले.
09:05 PM
हैदराबादला चौथा धक्का
विजय शंकरच्या रुपात हैदराबादला चौथा धक्का बसला. विजय शंकरला 18 चेंडूंत 27 धावा करता आल्या.
09:03 PM
हैदराबादचे शतक पूर्ण
विजय शंकरने चौदाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावत संघाचे शतक फलंदावर लावले.
08:41 PM
मनीष पांडे आऊट
मनीष पांडेच्या रुपात हैदराबादला मोठा धक्का बसला. मनीषला या सामन्यात फक्त 9 धावा करता आल्या.
08:39 PM
मार्टिन गप्तील आऊट
गप्तीलच्या रुपात हैदराबादला दुसरा धक्का बसला. गप्तीलला 30 धावा करता आल्या.
08:23 PM
वृद्धिमान साहा आऊट
07:56 PM
जेव्हा दोन प्रतिस्पर्धी करतात हास्यविनोद
07:56 PM
टॉसचा हा व्हीडीओ पाहा
07:50 PM
आरसीबीने नाणेफेक जिंकली.
आरसीबीने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले.