बंगळुरु, आयपीएल 2019 : पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 62 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची 3.2 षटकांत 1 बाद 41 अशी स्थिती असताना पाऊस आला आणि सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
12:33 AM
पावसामुळे सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला
12:17 AM
दुसऱ्या षटकात राजस्थानने बिनबाद 22 अशी मजल मारली
दुसऱ्या षटकापर्यंत राजस्थानने एकही विकेट न गमावता 22 धावा केल्या.
12:17 AM
संजू सॅमसन बाद
सॅमसनच्या रुपात राजस्थानला पहिला धक्का बसला. त्याने 13चेंडूंत 28 धावा केल्या.
11:58 PM
बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 62 धावा केल्या.
दमदार सुरुवातीनंतर बंगळुरुला पाच षटकांमध्ये सात फलंदाज गमावून 62 धावा करता आल्या.
11:56 PM
पवन नेगी आऊट
पवनच्या रुपात आरसीबीला सातवा धक्का बसला. पवनने 3 चेंडूंत 4 धावा केल्या.
11:55 PM
हेनरीच क्लासीन आऊट
क्लासीनला सात चेंडूंत सहा धावा करता आल्या.
11:50 PM
आरसीबीला पाचवा धक्का
11:45 PM
बंगळुरुला चौथा धक्का
11:40 PM
श्रेयस गोपालची दुसऱ्या षटकात हॅट्रिक
दुसऱ्या षटकात गोपालने कोहली, एबी आणि स्टॉइनिस यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली.
11:38 PM
कोहलीनंतर एबीही आऊट
कोहलीनंतर दुसऱ्याच चेंडूवर एबीही आऊट झाला. एबीने चार चेंडूंत 10 धावा केल्या.
11:36 PM
विराट कोहली आऊट
आरसीबीचा कर्णधार विराट कोहली सात चेंडूंत 25 धावा करून बाद झाला.
11:33 PM
पहिल्याच षटकात 23 धावा
09:06 PM
अखेर पाऊस थांबला
जोरदार बॅटींगनंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मैदानावर जाऊन पंच पाहणी करत आहेत.
08:12 PM
बंगळुरुमध्ये जोरदार पाऊस, पाहा हा व्हिडीओ
07:37 PM
राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकल्यावर राजस्थानने आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.