Join us  

IPL 2019 RCB vs KXIP : बंगळुरूचा पहिला विजय

मोहाली, आयपीएल 2019 : आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे गुणतालिकेत ते शेवटच्या ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 7:17 PM

Open in App

11:44 PM

बंगळुरुचा आठ विकेट्स राखून विजय



 

11:43 PM

बंगळुरुने पहिला सामना जिंकला

विराट कोहली आणि एबी डी' व्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला. गेल्या सात सामन्यांमधला त्यांचा हा पहिला विजय ठरला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेलच्या नाबाद 99 धावांच्या जोरावर 173 धावा केल्या होत्या. कोहली आणि डी' व्हिलियर्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळुरुने आठ विकेट्स राखत हा सामना जिंकला. डी' व्हिलियर्सने 38 चेंडूंत नाबाद 59 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोहलीने 53 चेंडूंत 67 धावा केल्या.

 

11:28 PM

एबी डी' व्हिलियर्सचे अर्धशतक पूर्ण

डी' व्हिलियर्सने 35 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.



 

11:14 PM

बंगळुरूला मोठा धक्का

विराट कोहलीच्या रुपात बंगळुरुला मोठा धक्का बसला. कोहलीने 53 चेंडूंत 67 धावा केल्या.



 

10:53 PM

विराटचे अर्धशतक

विराटने पंजाबविरुद्धच्या सामन्यात 37 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.



 

10:21 PM

पार्थिव पटेल आऊट

पार्थिव पटेलच्या रुपात बंगळुरुला पहिला धक्का बसला. पटेलने 9 चेंडूंत 19 धावा केल्या.

09:39 PM

गेलला जीवदान

विराट कोहलीने ख्रिस गेलला 83 धावांवर असताना जीवदान दिले. यावेळी उमेश यादव गोलंदाजी करत होता.

09:11 PM

सॅम कुरन आऊट

सॅम कुरनच्या रुपात पंजाबला चौथा धक्का बसला. कुरनला फक्त एक धाव करता आली.



 

09:10 PM

सर्फराझ खान आऊट



 

08:47 PM

मयांक अगरवाल आऊट

मयांकच्या रुपात पंजाबला दुसरा धक्का बसला. मयांकने 15 धावा केल्या.



 

08:44 PM

गेलचे 28 चेंडूंत अर्धशतक

गेलने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात 28 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. गेलने 50 धावा पूर्ण करताना 6 चौकार आणि तीन षटकार लगावले.

08:35 PM

लोकेश राहुल बाद

लोकेश राहुलच्या रुपात पंजाबला पहिला धक्का बसला. राहुलने 15 चेंडूंत 18 धावा केल्या. 



 

08:31 PM

पंजाबची दमदार सलामी

ख्रिस गेलच्या धडेकाबाज फलंदाजीमुळे बंगळुरुच्या गोलंदाजांना लोटांगण घालण्याची पाळी आली. दमदार फटकेबाजी करत गेलने सहाव्या षटकात पंजाबला 60 धावा करून दिल्या.

08:26 PM

राहुलला 12 धावांवर जीवदान

पंजाबचा सलामीवीर लोकेळ राहुलला 12 धावांवर असताना जीवदान मिळाले. यावेळी उमेश यादवच्या गोलंदाजीवर एबी डी' व्हिलियर्सने झेल सोडला.

07:40 PM

बंगळुरुने नाणेफेक जिंकली



 

07:26 PM

... तरीही आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकते', विराट कोहलीसाठी गूड न्यूज

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत सलग सहा सामने गमावले आहेत. त्यामुळे आरसीबी आता प्ले-ऑफमध्ये पोहोचणार नाही, असे म्हटले जात आहे. पण आरसीबीच्या एका खेळाडूला अजूनही आपला संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतो, असे वाटत आहे. या खेळाडूचे नाव आहे मोइन अली.

07:22 PM

सातव्या सामन्यात बंगळुरुला विजयाची आशा

आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये बंगळुरुला एकही विजय मिळवता आलेला नाही. पंजाबच्या घरच्या मैदानात बंगळुरु जिंकणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.

टॅग्स :रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019विराट कोहली