मुंबई, आयपीएल 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यांना आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे आणि आणखी एक पराभव त्यांचे लीगच्या प्ले ऑफमध्ये प्रवेशाच्या आशा धुळीस मिळवू शकतो. त्यामुळे RCBचे चाहते तणावात आहे, परंतु त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी गोलंदाज डेल स्टेन RCBच्या ताफ्यात दाखल होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज नॅथन कोल्टर-नायल याला बदली म्हणून स्टेन गन बंगळुरूच्या संघात येणार आहे.
IPL 2019 : आरसीबी की 'हार'सीबी, पराभवाच्या डबल हॅट्ट्रिकनंतर विराट कोहली होतोय ट्रोल
IPL 2019 : RCBच्या विजयावर खवय्यांच्या पैजा; नशिबाने उपासमारीची वेळ टळली