Join us  

IPL 2019 : अश्विनचा बुलेट थ्रो, तुम्ही पाहिलात का...

पहिल्याच चेंडूवर अश्विनने पृथ्वी शॉला बाद केले. हा दिल्लीसाठी मोठा धक्का होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 5:39 PM

Open in App

मोहाली, आयपीएल २०१९ : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबने जिंकला. या सामन्यात मोलाची भूमिका पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने बजावली. पहिल्याच चेंडूवर अश्विनने पृथ्वी शॉला बाद केले. हा दिल्लीसाठी मोठा धक्का होता. त्यानंतर पुन्हा एकदा अश्विनने दिल्लीला एक धक्का दिला.

फॉर्मात असलेला रिषभ पंत बाद झाल्यावर ख्रिस मॉरिस फलंदाजीला आला. मॉरिस हा चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. त्यामुळे तो दिल्लीला विजयापर्यंत पोहोचवू शकतो, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण अश्विन बुलेट थ्रो करत मॉरिसचा काटा काढला आणि पंजाबने विजयाच्या दिशेने कूच केली.

हा पाहा बुलेट थ्रो

 रिषभ पंत ( 39) आणि कॉलीन इंग्राम ( 38)  यांच्या 62 धावांच्या भागीदारीनंतरही दिल्ली कॅपिटल्सला सामना गमवावा लागला. 21 चेंडूंत 24 धावांची गरज असताना दिल्लीचे सात फलंदाज शिल्लक होते, परंतु तरीही किंग्स इलेव्हन पंजाबने 14 धावांनी सामना जिंकला. दिल्लीचे 7 फलंदाज अवघ्या 17 चेंडूंत 8 धावा करून माघारी परतले. मोहम्मद शमी ( 2/27) आणि सॅम कुरन ( 4/11) यांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा केला. कर्णधार रवीचंद्रन अश्विन यानेही दोन विकेट घेतल्या. पण, कुरनने घेतलेली हॅटट्रिक या सामन्यात चर्चेचा विषय ठरली. या कामगिरीसह कुरनने अनेक विक्रम मोडले आणि काहींशी बरोबरीही केली. पण, एका बाबतीत त्याने भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि सध्या मुंबई इंडियन्सच्या चमूत असलेल्या युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी केली. युवराजने 2009 मध्ये केलेल्या एका विशेष विक्रमाची पुनरावृत्ती कुरनने सोमवारच्या सामन्यात केली.

आयपीएलच्या एकाच सामन्यात सलामीला फलंदाजी आणि हॅटट्रिक हा योगायोग दहा वर्षांनी जुळून आला. सॅन कुरनने सोमवारच्या सामन्यात सलामीला फलंदाजी केली आणि हॅटट्रिक केली. याआधी युवराज सिंगने 2009 मध्ये पंजाबकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध असा पराक्रम केला होता.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात कुरनने 2.2 षटकांत 11 धावा देत 4 फलंदाज बाद केले. आयपीएलमधील पंजाबच्या गोलंदाजाने नोंदवलेली ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. या क्रमवारीत अंकित रजपूत ( 5/14 वि. सनरायझर्स हैदराबाद, 2018) आणि मास्केरेन्हास ( 5/25 वि. पुणे वॉरियर्स इंडिया, 2012) हे आघाडीवर आहेत. 3 बाद 144 धावांवरून दिल्ली कॅपिटल्सचा संघ 152 धावांत तंबूत परतला. आयपीएल इतिहासात सात विकेट 8 धावांत आणि 17 चेंडूत पडण्याची ही पहिलीच आणि लाजीरवाणी घटना आहे.

दिल्लीचे पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. आयपीएलमधील ही दुसरी लाजीरवाणी कामगिरी ठरली. दिल्लीच्या पृथ्वी शॉ, ख्रिस मॉरिस, हर्षल पटेल, कागिसो रबाडा व संदीप लामिछाने हे शून्यावर बाद झाले. याआधी कोची टस्कर्सचे सहा फलंदाज डेक्कन चार्जर्सविरुद्ध भोपळा न फोडता माघारी परतले होते. 

टॅग्स :आर अश्विनकिंग्ज इलेव्हन पंजाबआयपीएल 2019दिल्ली कॅपिटल्स