Join us  

IPL 2019 : पोलार्ड हे वागणं बर नव्हं, नेमके काय घडले पाहा या व्हिडीओमध्ये...

या सामन्यात पोलार्डच्या रागाचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 9:53 PM

Open in App

हैदराबाद, आयपीएल २०१९ : आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सनेचेन्नई सुपर किंग्सपुढे १५० धावांचे आव्हान ठेवले. मुंबईला हे आव्हान चेन्नईपुढे ठेवता आले ते कायरन पोलार्डमुळेच. कारण पोलार्डने या सामन्यात २५ चेंडूंत नाबाद ४१ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच मुंबईला चेन्नईपुढे आव्हनात्मक धावसंख्या ठेवता आली. पण या सामन्यात पोलार्डच्या रागाचा पारा चांगलाच चढलेला पाहायला मिळाला.

या सामन्याच्या अखेरच्या षटकात ही गोष्ट पाहायला मिळाली. हे षटक ड्वेन ब्राव्हो टाकत होता. या षटकातील तिसरा चेंडू वाईडच्या लाईनच्या बाहेर पडला. पण पंचांनी यावेळी वाईड दिला नाही. त्यावेळी पोलार्ड चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला. पोलार्डने बॅट हातातून उंच उडवली. त्यानंतर चेंडूचा सामना करण्यासाठी पोलार्ड वाईडच्या लाईनजवळ जाऊन उभा राहिला आणि त्याने चेंडू खेळण्यास नकार दिला. त्यावेळी दोन्ही पंचांना पोलार्डची समज काढली आणि सामना सुरु झाला.

पाहा हा व्हिडीओ

फायनलमधली ही भन्नाट कॅच पाहायलाच हवी, पाहा व्हिडीओ...आयपीएलच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सनेचेन्नई सुपर किंग्सपुढे १५० धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यात एक भन्नाट कॅच पाहायला मिळाली. ही कॅच आपल्याच गोलंदाजीवर पकडली ती चेन्नईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने.

मुंबईचे फलंदाज संयतपणे फलंदाजी करत होता. यावेळी कृणाल पंड्या खेळत होता. शार्दुलने एक बाऊन्सर पंड्याच्या दिशेने टाकला. पंड्याला हा चेंडू व्यवस्थित खेळता आला नाही आणि हा चेंडू हवेत उडाला. त्यावेळी शार्दुलने धावत जात अफलातूल झेल पकडला.

हा पाहा व्हिडीओ

अखेरच्या षटकांमध्ये कायरन पोलार्डने धडाकेबाज फलंदाजी केली. त्यामुळेच आयपीएलच्या अंतिम फेरी मुंबई इंडियन्सलाचेन्नई सुपर किंग्सपुढे 150 धावांचे आव्हान ठेवता आले. चेन्नईकडून दीपक चहरने भेदक मारा करत तीन फलंदाजांना बाद केले. इम्रान ताहिर आणि शार्दुल ठाकूर यांनी यावेळी दोन विकेट्स मिळवत चहरला चांगली साथ दिली.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर त्यांची धावगती थोडीशी मंदावली. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी मुंबईला स्थैर्य मिळवून द्यायचा प्रयत्न केला, पण त्यांना यामध्ये अपयश आले. कृणाल पंड्यालाही जास्त धावा करता आल्या नाहीत.

मुंबईचा अर्धा संघ माघारी परतला खरा, पण त्यानंतर कायरन पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे मुंबईला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. पंड्याला यावेळी पाच धावांवर जीवदान सुरेश रैनाने दिले. पण या जीवदानाचा फायदा पंड्याला उचलता आला नाही. पंड्या १६ धावांवर बाद झाला.

फायनलमध्ये धोनीच्या नावावर झाला 'हा' विक्रमआयपीएलच्या अंतिम फेरीला सुरुवात झाली आहे. मुंबईने धडाकेबाज सुरुवात केली असली तरी रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक बाद झाल्यावर त्यांची धावगती थोडीशी मंदावली. पण या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर एक विक्रम झाला आहे.

या सामन्यात तुफानी सुरुवात केली ती डीकॉकने. पण शार्दुल ठाकूरने त्याला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. त्यानंतर दीपक चहरने रोहित शर्माला धोनीवकरवी झेलबाद केले आणि मुंबईला मोठा धक्का दिला. या विकेटसह धोनीने आपल्या नावावर एक विक्रम झाला आहे. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये स्टम्पमागे सर्वाधिक झेल आणि यष्टीचीत करणारा धोनी सर्वोत्तम यष्टीरक्षक ठरला आहे. धोनीने रोहितचा झेल पकडत आयपीएलमध्ये १३२ फलंदाजांना बाद केले आहे. धोनीने यावेळी दिनेश कार्तिकला पिछाडीवर टाकले आहे.

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्स