मुंबई, आयपीएल 2019 : आयपीएलच्या बाराव्या हंगामाला शनिवारपासून सुरुवात होत आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे. पण आतापासून चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे फॅन्स त्याचावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने तर विराट कोहली हा दुसरा सचिन तेंडुलकर आहे, अजिंक्य रहाणे हा दुसरा द्रविड आहे, पण दुसरा धोनी होणेच नाही, अशा आशयाचा फलक झळकावला होता. आयपीएलने आपल्या ट्विटर हँडलवर ही पोस्ट टाकली आहे.
चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात आतापर्यंत 23 सामने खेळवले गेले. या 23 सामन्यांपैकी 15 सामन्यांमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. तर बंगळुरूला सात सामने जिंकता आलेले आहेत, यामध्ये एका सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.
एकूण सामने: 23*
चेन्नई विजयी: 15
बंगळुरू विजयी : 7
निकाल नाही: 1.
दोन्ही संघांमध्ये चेन्नईमध्ये सात सामने खेळले गेले. या सात सामन्यांपैकी सहा सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर फक्त एकच सामना बंगळुरुला जिंकता आला आहे. बंगळुरुमध्ये दोन्ही संघांत आठ सामने खेळवले गेले. या आठ सामन्यांमध्ये चेन्नईने चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, तर बंगळुरुला तीन सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांमध्ये तटस्थ ठिकाणी आठ सामने खेळवले गेले, यामध्ये चेन्नईला पाच आणि बंगळुरुला तीन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघांतील सामन्यांमध्ये सर्वाधिक लढती चेन्नईच्या सुरेश रैना आणि विराट कोहली यांच्या नावावर आहेत. दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी 22 सामने खेळले आहेत.
चेन्नईचे सामने कधी व कोठे?
23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई
26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
31 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई
3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
6 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई
9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई
11 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर
14 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
17 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद
21 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
23 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई
26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
1 मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
5 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स , मोहाली
चेन्नई सुपर किंग्सचा संघ
महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, फॅफ ड्यू प्लेसिस, मुरली विजय, रवींद्र जाडेजा, सॅम बिलिंग, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एनगिडी, इम्रान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायुडू, हरभजन सिंग, दीपक चहर, के एम आसीफ, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, कर्ण शर्मा, ध्रुव शोराय, एन जगदीशन, शार्दूल ठाकूर, मोनू कुमार, चैतन्य बिशोनी.