हर्षा भोगले लिहितात...
काही दिवसांपूर्वी क्रिकबज लाईव्हच्या युवा संघाने आश्चर्यचकित करणारी आकडेवारी सादर केली. केकेआर आणि आरसीबी यांच्यादरम्यान इडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या यापूर्वीच्या लढतीत आम्हाला विशेष आक्रमक फलंदाजी बघायला मिळाली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात ३५ पैकी ११ लढतींमध्ये अखेरच्या तीन षटकांमध्ये ५० पेक्षा अधिक धावा फटकावल्या गेल्या. गेल्या चार मोसमांचा विचार करता असे केवळ २, ३, ४ आणि सहा वेळा घडले.
काय जबरदस्त आक्रमक फलंदाजीने नवा स्तर गाठला आहे? गोलंदाज या खेळामध्ये एका नव्या आव्हानाला सामोरे जात आहेत. येथे आकडेवारी त्यांच्या विनाशाचा जल्लोष साजरा करीत आहे. तुम्ही यासाठी माहीत असलेल्या कारणांचा पुरावा देऊ शकता. जसे बॅटचा मोठा आकार, पांढरा चेंडूचे कमी स्विंग होणे, पाटा खेळपट्टी, लहान सीमारेषा. पण, यापैकी कुठल्याही कारणांमध्ये अलीकडच्या वर्षांमध्ये फार मोठे बदल झालेले नाहीत. आतापर्यंत अखेरच्या तीन षटकांमध्ये ५० धावा फटकावण्याच्या पराक्रमाची प्रत्येकी १० व्या लढतीमध्ये पुनरावृत्ती होत होती, पण यंदाच्या मोसमात प्रत्येकी तिसऱ्या सामन्यात असे घडताना दिसून येते. हे सर्व फलंदाज अधिक शक्तिशाली होत असल्यामुळे घडत आहे का ? जर तुम्ही वर्तमान काळातील सर्वात आक्रमक फलंदाज आंद्रे रसेलला बघितले तर या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक राहील, पण दुसºया बाजूचा विचार करता हार्दिक पांड्यासारख्या साधारण उंची व साधारण शरीरयष्टी लाभलेल्या खेळाडूचा विचार केला तर काय सांगाल. याचा अर्थ केवळ खेळाडूची शरीरयष्टी आक्रमक फलंदाजीचा आधार नाही. मग काय फलंदाजांच्या मानसिकतेमध्ये बदल झाला आहे ? ते वेगळ्या विचाराने खेळतात ? ते गोलंदाजाच्या लहानशा चुकीला मोठी शिक्षा देण्यासाठी आणखी सक्षम झाले? गोलंदाज चूक करीत आहेत ? दवामुळे ओल्या चेंडूने गोलंदाजी करणे कठीण जात आहे ?
यासाठी कुठले एक कारण असू शकत नाही, पण याची शहनिशा करणे आवश्यक आहे. कारण यामुळे चांगल्या खेळपट्ट्यांवर लक्ष्याचा पाठलाग करण्याची पद्धत बदलली आहे.