Join us  

IPL 2019 : मुंबई इंडियन्सला नवा 'हिटमॅन' सापडला; रोहित शर्माला पाठवला मॅसेज

IPL 2019: इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) आगामी सत्रापूर्वी मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 1:37 PM

Open in App
ठळक मुद्देमुंबईतील युवा खेळाडूनं मोडला रोहितचा 264 धावांचा विक्रममुंबई इंडियन्स संघाने घेतली दखल

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) आगामी सत्रापूर्वी मुंबई इंडियन्स सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यावर, सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेवर ते बारकाईने लक्ष ठेवून आहे. भारतीय संघातील आणि स्थानिक स्पर्धेत विविध संघात खेळणाऱ्या त्यांच्या खेळाडूंच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे संघातील प्रत्येक खेळाडूच्या उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करण्याची संधी ते सोडत नाही. अशाच स्थानिक सामन्यातून त्यांना नवा 'हिटमॅन' सापडला आहे. मुंबई इंडियन्सने या नव्या 'हिटमॅन'ची ओळख करून देताना रोहित शर्माला मॅसेज पाठवला आहे.

अभिनव सिंग असे नाव असलेल्या या खेळाडूने रोहित शर्माच्या वन डे क्रिकेटमधील 264 धावांचा विक्रमाला मागे टाकले आहे. रोहितच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये तीन द्विशतकांचा समावेश आहे. मात्र, रिझवी स्प्रींगफिल्ड संघाच्या अभिनवने मुंबई इंडियन्सच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत 265 धावा चोपल्या आहेत. मुंबई इंडियन्सने अभिनवचा फोटो  पोस्ट करून रोहितसाठी एक मॅसेज टाईप केला आहे. अभिनवच्या या खेळीने रोहितने 2014 मध्ये श्रीलंकेविरुद्ध केलेल्या 264 धावांच्या खेळीची आठवण करून दिली. त्या सामन्यात रोहितने 33 चौकार व 9 षटकार खेचून 152.33 च्या सरासरीनं 173 चेंडूंत 264 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात श्रीलंकेला 153 धावांनी पराभव पत्करावा लागला होता आणि विशेष म्हणजे त्यांना रोहितच्या वैयक्तिक 264 धावांचा पल्लाही ( 251) ओलांडता आला नव्हता.मुंबई इंडियन्सच्या ट्विटला रोहितनं आणखी उत्तर दिलेलं नाही. रोहित सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी कसून सराव करत आहे. वर्ल्ड कप स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितनं 65.85च्या सरासरीनं धावा चोपलेल्या आहेत आणि घरच्या मैदानावरही त्याची सरासरी 64.37 इतकी आहे. पाच सामन्यांच्या वन डे मालिकेनंतर रोहित मुंबई इंडियन्सच्या जर्सीत खेळून चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी उत्सुक आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात  मुंबई इंडियन्सच्या वाट्याला चार सामने आले आहेत. आठही संघांना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर बंगळुरु यांच्या वाट्याला प्रत्येकी पाच सामने आले आहेत. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर दोन आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर दोन सामने खेळतील. मुंबईचा पहिला सामना 24 मार्चला वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स ( आधीचे दिल्ली डेअरडेव्हिल्स) यांच्याशी होणार आहे. 

मुंबई इंडियन्सचे सामने कधी व कोणाशी? 24 मार्च    मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स    मुंबई28 मार्च    रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स बंगळुरू30 मार्च    किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स    मोहाली3 एप्रिल    मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    मुंबई 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सआयपीएलआयपीएल 2019इंडियन प्रीमिअर लीग