Join us  

IPL 2019 : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीपूर्वी कॅप्टन कूल धोनीला आला ताप, CSKला धक्का

IPL 2019 : चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना यजमान चेन्नईला मोठा धक्का बसला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 7:24 PM

Open in App

चेन्नई, आयपीएल 2019 : चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात होण्यासाठी अवघ्या काही मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना यजमान चेन्नईला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज आहेत. पण, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स संघ चेन्नईतही आपली ताकद दाखवण्यासाठी आतुर आहे. या सामन्यापूर्वीच चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ताप आला असून तो या सामन्यात खेळणार नाही. त्याच्याजागी सुरेश रैना आज चेन्नईचे नेतृत्व सांभाळणार आहे.

 

‘प्ले ऑफ’साठी आवश्यक 16 गुणांची कमाई केल्यानंतरही चेन्नई शुक्रवारी कट्टर प्रतिस्पर्धी मुंबईविरुद्ध होणाऱ्या लढतीत वर्चस्वपूर्ण विजय मिळवून स्वत:चे अव्वल स्थान अबाधित राखण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. तीन वेळा जेतेपद पटकावलेल्या या दोन चॅम्पियन संघातील हा सामना चुरशीचा होईल, यात शंका नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाने दोन पराभवानंतर पुन्हा विजयपथावर वाटचाल केली. शेन वॉटसनच्या आक्रमक खेळीच्या बळावर त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा सहा गड्यांनी पराभव केला.

मुंबई-चेन्नई सामना म्हणजे 'एकदम कSSSडक', सांगतोय रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा पाहुणचार करण्यासाठी सज्ज आहेत. हिटमॅन रोहितने या दोन संघांमधील लढतीला आयपीएलमधील 'ElClassico' असे संबोधले आहे. स्पॅनिश फुटबॉल लीगमधील दोन कट्टर प्रतिस्पर्धी रेयाल माद्रिद आणि बार्सिलोना यांच्यातील सामन्याला जगभरात ElClassico असे संबोधले जाते. आज जसे भारतातील क्रिकेट चाहते चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या सामन्यासाठी आतुरले आहेत. तशीच आतुरता जगभरातील फुटबॉल चाहत्यांना बार्सिलोना आणि रेयाल माद्रिद यांच्यातील सामन्यासाठी असते. या दोन क्लबचा सामना पाहण्यासाठी लाखाहून अधिक प्रेक्षक क्षमता असलेले स्टेडियमही खच्चून भरलेले असते. एवढेच काय तर स्टेडियमबाहेर लावलेल्या जायंट स्क्रीनवर हा सामना पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने फुटबॉल चाहते उपस्थित असतात.असेच वातावरण आजच्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्याली सामन्यादरम्यान पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :आयपीएल 2019चेन्नई सुपर किंग्समुंबई इंडियन्समहेंद्रसिंग धोनी