Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2019 : आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातही धोनीने बजावला मतदानाचा हक्क

मतदान केल्यावर झिवाने साऱ्या देशवासियांसाठी एक संदेशही दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 23:41 IST

Open in App

झारखंड, आयपीएल 2019 : महेंद्रसिंग धोनी हा एक आदर्शवत क्रिकेटपटू आहे. आतापर्यंत धोनीने बरेच आदर्श युवा खेळाडूंपुढे ठेवले आहेत. आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातही धोनीने मतदानाचा हक्क बजावत एक नवा आदर्श सर्वांपुढे ठेवला आहे.

रविवारी धोनी खेळत असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची किंग्स इलेव्हन पंजाबबरोबर मॅच होती. या सामन्यात चेन्नईला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सोमवारी सकाळी धोनी मोहालीहून झारखंडला आपल्या घरी आला. त्यानंतर एका तासातच धोनी पत्नी साक्षी, वडिल पान सिंह धोनी आणि आई देवकी देवी यांच्याबरोबर मतदान करायला घराबाहेर पडला. यावेळी धोनीबरोबर त्याची लाडकी लेक झिवाही होती. मतदान केल्यावर झिवाने साऱ्या देशवासियांसाठी एक संदेशही दिला.

झिवाने काय संदेश दिला तो पाहा...

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्स