Join us

आयपीएलला मुकला म्हणून मिचेल स्टार्सने विमा कंपनीला न्यायालयात खेचले

IPL 2019 : ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कला इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील मोसमात दुखापतीमुळे खेळता आले नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 12:59 IST

Open in App

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज मिचेल स्टार्कला इंडियन प्रीमिअर लीगच्या मागील मोसमात दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्यामुळे त्याने विमा कंपनीविरोधात 1.53 मिलियर डॉलर म्हणजेच 10.6 कोटीच्या ( भारतीय चलनात) नुकसान भरपाईसाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत स्टार्कला दुखापत झाली होती आणि त्याला पुढील सामन्यातही दुखापत झाली. त्यामुळे त्याला आयपीएलच्या संपूर्ण मोसमात खेळता आले नव्हते. 

कोलकाता नाइट रायडर्ससोबत खेळण्यासाठी स्टार्क आणि विमा कंपनीत 1.80 मिलियन ( 12.5 कोटी) चा करार झाला होता. त्या करारानुसारच स्टार्कने व्हिक्टोरियन काउंटी न्यायालयात याचिका दाखल केली.  2018 मध्ये आयपीएलमध्ये त्याला एकही सामना खेळता आला नव्हता, तर 2019चे सत्र सुरू होण्यापूर्वी KKR ने त्याला रिलीज केले.

स्टार्कने न्यायलयात दाखल केलेल्या याचिकेनुसार त्याने 10.6 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. स्टार्कने 97200 डॉलर इतकी पॉलिसी रक्कमही भरली असून तिचा कालावधी हा 27 फेब्रुवारी ते 31 मार्च 2018 असा होता. विमा कंपनीने स्टार्कची वैद्यकिय चाचणी केली होती आणि त्यात स्टार्कच्या काही जुन्या दुखापतींबाबत निषेध व्यक्त केला होता.

टॅग्स :आयपीएल 2019कोलकाता नाईट रायडर्स