Join us  

IPL 2019 MI vs RR : रंगतदार सामन्यात राजस्थान रॉयल्सची बाजी

मुंबई, आयपीएल 2019 : क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माच्या फटकेबाजीला जोस बटलर आणि अजिंक्य रहाणेकडून सडेतोड उत्तर मिळाले. ...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 3:23 PM

Open in App

13 Apr, 19 07:47 PM

प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर राजस्थानचा पहिला विजय

 

13 Apr, 19 07:32 PM

चौकार अडवताना मुंबई इंडियन्सच्या जोसेफ अल्झारीला दुखापत झाली. त्याची ही दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळलेले नाही. 

13 Apr, 19 07:28 PM



 

13 Apr, 19 07:27 PM

बुमराहने 19व्या षटकात स्टीव्हन स्मिथला बाद करताना राजस्थानला मोठा धक्का दिला. स्मिथ 15 चेंडूंत 12 धावा केल्या. 

13 Apr, 19 07:22 PM

पुढच्याच षटकात राहुल त्रिपाठी माघारी फिरला. कृणाल पांड्याने त्याला बाद केले.

13 Apr, 19 07:19 PM

जसप्रीत बुमराहने राजस्थानला आणखी एक धक्का दिला. त्याने संजू सॅमसनला ( 31) बाद केले. 

13 Apr, 19 07:14 PM

राजस्थान रॉयल्सला हव्यात विजयासाठी 20 धावा



 

13 Apr, 19 07:01 PM



 

13 Apr, 19 07:01 PM

राहुल चहरने मुंबईला यश मिळवून दिले. त्याने 43 चेंडूंत 8 चौकार व 7 षटकार खेचून 89 धावा करणाऱ्या बटलरला बाद केले. 

13 Apr, 19 06:59 PM

बटलरचा हा झंझावात कायम राहिला. अल्झारीने टाकलेल्या 13व्या षटकात बटलरने 6, 4, 4, 4, 4, 6 अशा 28 धावा चोपल्या. 



 

13 Apr, 19 06:46 PM

13 Apr, 19 06:46 PM

बटलरने 10व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत संघाचे शतक आणि वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. बटरलने 50 धावांसाठी 29 चेंडूंचा सामना केला आणि त्यात 4 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. 

13 Apr, 19 06:40 PM



 

13 Apr, 19 06:39 PM

बटलरने कृणालच्या पुढच्याच षटकात 16 धावा चोपून काढल्या. त्यात दोन खणखणीत षटकारांचा समावेश होता. 

13 Apr, 19 06:32 PM

मात्र, टाईम आऊटनंतरच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर अजिंक्य बाद झाला. कृणाल पांड्याने डीप मिडविकेटला सूर्यकुमार यादव करवी त्याला झेलबाद केले. अजिंक्यने 21 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकारासह 37 धावा केल्या.

13 Apr, 19 06:28 PM

13 Apr, 19 06:27 PM



 

13 Apr, 19 06:26 PM

पॉवर प्लेमध्ये राजस्थानने एकही विकेट न गमावता 59 धावा केल्या. 

13 Apr, 19 06:23 PM

लक्ष्याचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे आणि जोस बटलर यांनी राजस्थानला दमदार सुरुवात करून दिली. घरच्या मैदानावर खेळणारा अजिंक्य चांगल्या फॉर्मात दिसला. त्याने जोसेफ अल्झारीच्या एका षटकात 17 धावा चोपून काढल्या. 

13 Apr, 19 06:10 PM

हार्दिक पांड्याची हॅलिकॉप्टर फटकेबाजी पाहा...



 

13 Apr, 19 05:47 PM

राजस्थान 188 धावांचे लक्ष्य पार करणार का?



 

13 Apr, 19 05:47 PM

13 Apr, 19 05:37 PM

इशान किशन 5 धावांवर बाद. जयदेव उनाडकतने त्याला बाद केले.

13 Apr, 19 05:33 PM

19व्या षटकात डी कॉक बाद झाला. आर्चरने त्याला बटलरकरवी झेलबाद करत तंबूत पाठवले. डी कॉकने 52 चेंडूंत 6 चौकार व 4 षटकारांसह 81 धावा केल्या. 

13 Apr, 19 05:25 PM



 

13 Apr, 19 05:22 PM

रोहित बाद झाल्यानंतर मुंबईची धावगती काहीशी संथ झाली. आर्चरने 17 व्या षटकात किरॉन पोलार्डला बाद करून मुंबईला मोठा धक्का दिला. पोलार्ड अवघ्या 6 धावांवर माघारी परतला.

13 Apr, 19 05:14 PM

श्रेयस गोपाळची उत्तम गोलंदाजी



 

13 Apr, 19 05:11 PM

मुंबई इंडियन्सने 15 षटकांत 2 बाद 126 धावा केल्या. 



 

13 Apr, 19 05:08 PM

13 Apr, 19 05:06 PM

त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवलाही फार काही करता आले नाही. धवल कुलकर्णीने त्याचा त्रिफळा उडवला.

13 Apr, 19 05:03 PM

मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात अजब दृश्य पाहायला मिळाले.



 

13 Apr, 19 04:48 PM

मुंबईने 10 षटकांत एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या. पण पुढच्याच षटकात रोहित बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याला जोस बटलरकरवी झेलबाद केले. रोहितने 32 चेंडूंत 6 चौकार व 1 षटकार खेचून 47 धावा केल्या. 



 

13 Apr, 19 04:44 PM

गौथमने टाकलेल्या दहाव्या षटकातही चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली, परंतु त्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पुढे आलेल्या रोहितला बाद करण्यासाठी गौथमने चेंडू वाईडच्या दिशेने टाकला, रोहितनेही त्याचे फुटबॉल स्किल दाखवताना पायाने तो चेंडू अडवला.
 

13 Apr, 19 04:41 PM



 

13 Apr, 19 04:37 PM

या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी करताच आणखी एक विक्रमाची नोंद केली. यंदाच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सकडून झालेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. 
 

13 Apr, 19 04:27 PM

मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता जवळपास दहाच्या सरासरीने 57 धावा केल्या. पॉवर प्लेमधील मुंबई इंडियन्सची ही दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली. त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 1 बाद 62 धावा केल्या होत्या. दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेमध्ये एकही विकेट गमावलेली नाही. 

13 Apr, 19 04:21 PM

पाचव्या षटकात मुंबईचे अर्धशतक



 

13 Apr, 19 04:17 PM

त्यानंतर धवल कुलकर्णीने टाकलेल्या चौथ्या षटकार रोहित-डी कॉक जोडीने 14 धावा जोडल्या.
 

13 Apr, 19 04:13 PM

कृष्णप्पा गौथमच्या तिसऱ्या षटकात मुंबई इंडियन्सने 18 धावा चोपल्या. क्विंटन डी कॉकने 13 धावा काढल्या, तर रोहितने 5 धावांची भर घातली.
 

13 Apr, 19 04:05 PM

. या सामन्यात मैदानावर उतरण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा यांनी अनुक्रमे द्विशतक व शतक पूर्ण केले.

IPL 2019 : मैदानावरउतरताचमुंबईइंडियन्सचेद्विशतक, तररोहितचेशतकhttps://t.co/Px3c4NGneW@mipaltan@ImRo45@rajasthanroyals@IPL#MIvRR

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) April 13, 2019  

13 Apr, 19 03:54 PM

IPL 2019 : मुंबईइंडियन्सचासामनाकरण्यापूर्वीचराजस्थानरॉयल्सलाधक्काhttps://t.co/Qgz7kOUbPx@rajasthanroyals@mipaltan@IPL#MIvRR

— LokmatMedia Pvt Ltd (@MiLOKMAT) April 13, 2019  

13 Apr, 19 03:41 PM

राजस्थान रॉयल्स : अजिंक्य रहाणे, जोस बटलर, संजू सॅमसन, स्टीव्हन स्मिथ, राहुल त्रिपाठी, लिअॅम लिव्हिंगस्टोन, कृष्णप्पा गौथम, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाळ, जयदेव उनाडकत, धवल कुलकर्णी

13 Apr, 19 03:39 PM

मुंबईचा संघ : रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, किरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जोसेफ अल्झारी, राहुल चहर, जेसन बेहरेनडॉर्फ, जसप्रीत बुमराह

13 Apr, 19 03:35 PM

  • दोन्ही संघ आतापर्यंत 21 वेळा एकमेकांसमोर आले आणि मुंबई इंडियन्सने सर्वाधिक 11 विजय मिळवले आहेत, तर राजस्थानच्या खात्यात 9 विजय आहेत.
  • मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबईने सहा, तर राजस्थानला दोनच विजय मिळवता आले आहेत.  
  • मुंबई इंडियन्सविरुद्ध संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने मुंबईविरुद्ध 385 धावा केल्या आहेत. तर पोलार्डने राजस्थानविरुद्ध 335 धावा केल्या आहेत.
  • पोलार्डने राजस्थानविरुद्ध सर्वाधिक 14 विकेट घेतल्या आहेत, तर राजस्थानच्या धवल कुलकर्णीनं यजमानांविरुद्ध 8 विकेट घेतल्या आहेत. 

13 Apr, 19 03:34 PM

नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने



 

13 Apr, 19 03:34 PM

मुंबईच्या संघात एक बदल, सिद्धेश लाड OUT रोहीत शर्मा IN 



 

13 Apr, 19 03:32 PM

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय



 

13 Apr, 19 03:28 PM

विशेष पाहुण्यांचे मुंबई इंडियन्सकडून खास स्वागत



 

13 Apr, 19 03:25 PM

मुंबई इंडियन्सचे मनोबल उंचावण्यासाठी 21000 मुलांची फौज

Education and Sports for all या मोहिमेंतर्गत वानखेडेवर आज होणाऱ्या सामन्यात 21000 मुल-मुली उपस्थित राहणार आहेत.



 

टॅग्स :आयपीएल 2019मुंबई इंडियन्सराजस्थान रॉयल्सरोहित शर्माअजिंक्य रहाणे