Join us  

IPL 2019 : हैदराबादला नमविण्यासाठी रोहितचा गनिमी कावा, पाहा व्हिडीओ 

सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 9 धावांचे आव्हान ठेवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 11:30 AM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 - सुपर ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादवर विजय मिळवत मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. हैदराबादने मुंबईपुढे सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 9 धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने हे आव्हान लीलया पार केले आणि प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. निर्धारित 20 षटकांत मुंबई इंडियन्स केलेल्या 5 बाद 162 धावांच्या प्रत्युत्तरात हैदराबादने 6 बाद 162 धावा केल्या. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने गनिमी कावा रचला होता त्यात हैदराबादचा संघ अडकला.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मागील काही सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले पाहायला मिळाले आहे. त्यामुळे रोहितचा हा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता. हाच रोहितचा गनिमी कावा होता. क्विंटन डी कॉकच्या (69) अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने 162 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. प्रत्युतरात मनीष पांडे (71) वगळता हैदराबादच्या एकाही फलंदाजाला आत्मविश्वासाने खेळ करता आला नाही. तरीही त्यांनी सामन बरोबरीत सोडवला. पण, सुपर ओव्हरमध्ये त्यांना अपयश आले.

सामना संपल्यानंतर रोहितने गनिमी कावा आखल्याचे सांगितले. "मला माहीत होते की आम्ही जिंकणार आहोत, म्हणून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. येथील खेळपट्टीचा लहरी स्वभाव पाहायला मिळाला. धावांचा पाठलाग करताना चेंडू अधिक टर्न झाल्याचे पाहायला मिळाले. खेळपट्टीवर दव साचत असल्याने फिरकी गोलंदाजांना भरपूर मदत मिळत होती. RCB विरुद्ध 170 धावांचा पाठलाग करताना आम्ही तो अनुभव घेतला. अखेरच्या षटकात आम्ही विजय मिळवला. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की  नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायची आणि  समाधानकारक लक्ष्य उभं करायचे," असे रोहितने सांगितले. 

तो पुढे म्हणाला," CSK विरुद्ध आम्ही 170 धावांचा यशस्वी बचाव केला. 160 धावा या तितक्या आव्हानात्मक नव्हत्या. मात्र, CSK विरुद्धच्या यशाने आमचा आत्मविश्वास वाढला आणि म्हणून आम्ही प्रथम फलंदाजी स्वीकारली. आमच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावली." 

पाहा व्हिडीओ...

https://www.iplt20.com/video/185397/i-back-my-bowlers-to-defend-runs-rohit-sharma

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सआयपीएलआयपीएल 2019